Daridra Yoga : ग्रह जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा काही शुभ आणि अशुभ योग तयार होता. असाच एक अशुभ तयार झाला आहे दारिद्र योग, त्यामुळे काही राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे.
कर्क राशीत मंगळाच्या गोचरामुळे अतिशय अशुभ योग म्हणजे दरिद्र योग तयार झाला आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार झाला आहे त्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
दरिद्रा योग हा 1 जुलै 2023 पर्यंत मिथुन आणि मकर राशीसह 4 राशींना सर्वाधिक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
या राशींच्या लोकांना दरिद्रा योगाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. यांच्या हातात मुळीच पैसा टिकणार आहे. या काळात तुमच्या खर्च वाढणार आहे. घरामधील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
तुमचं प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात संकट येईल.
व्यवसायांना या योगाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. आर्थिक संकटाचा त्यांना सामना करावा लागेल. वैवाहिक जीवनात कहल निर्माण होईल.
या लोकांनी जर गुंतवणूक केली असेल तर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती खराब होणार आहे. या काळात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आर्थिक निर्णय देखील टाळा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)