PHOTOS

देब मुखर्जी यांचे राणी, काजोल आणि इतर बॉलिवूड कलाकारांसोबतचे हृदयस्पर्शी क्षण

चित्रपट निर्माता अयान मुखर्जीचे वडील, ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचे 14 मार्च रोजी वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. देब मुखर्जी हे अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या कुटुंबाशीही संबंधित होते. पाहूयात देब मुखर्जी यांचे  दुर्गा पूजा उत्सवातील खास क्षण. 

Advertisement
1/7

मुंबईतील एक अत्यंत लोकप्रिय दुर्गा पूजा उत्सव, उत्तर मुंबई सार्वजनिक दुर्गा पूजा पंडालच्या आयोजनामध्ये देब मुखर्जी यांचा मोठा सहभाग असतो. 

2/7

या पंडालमध्ये दरवर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश होतो. देब मुखर्जी त्यांची भाची काजोल आणि तिची आई तनुजा यांच्यासोबत पोज देताना दिसत होते.

3/7

दुर्गा पूजा उत्सवादरम्यान, देब मुखर्जी अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासोबतही उपस्थित होते. या जुन्या फोटोंमध्ये देब मुखर्जी दुर्गा पूजा उत्सवात राणी मुखर्जीला घट्ट मिठी मारताना दिसत आहेत.

4/7

1941 मध्ये कानपूरमध्ये जन्मलेले देब मुखर्जी एक प्रतिष्ठित आणि यशस्वी चित्रपट कुटुंबातील होते. त्यांची आई सतीदेवी ही दिग्गज अभिनेता अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार यांची एकुलती एक बहीण होती.

5/7

त्यांच्या कुटुंबात अभिनेता जॉय मुखर्जी आणि चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांचा समावेश होता. शोमू मुखर्जी यांचे लग्न बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांच्याशी झाले. 

6/7

देब मुखर्जी यांचे दोन वेळा लग्न झाले होते. पहिल्या लग्नातून त्यांना मुलगी सुनीता आहे.  सुनिताचे लग्न चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्याशी झाले. तर देब यांच्या दुसऱ्या लग्नातून अयान यांचा जन्म झाला.

7/7

देब मुखर्जी यांनी 1960 च्या दशकात 'तू ही मेरी जिंदगी' आणि 'अभिनेत्री' सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारत आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली.





Read More