जमिनीच्या वरतून ट्रेन धावताना तर तुम्ही पाहिले असेलच. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने आता जमिनीखालूनही ट्रेन धावतात दिसतात. या ट्रेन म्हणजे विज्ञानाचा चमत्कारच म्हणावा लागेल.
जमिनीखालून धावणारा एक रेल्वे मार्ग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जमीनीपासून 2450 मीट खोल बनवण्यात आलेल्या या बोगद्याची लांबी 57.1 किमी आहे. हा बोगदा बांधण्यासाठी 17 वर्षांचा कालावधी लागला.
हा जगातील सर्वात खोल बोगदा असून हा बोगदा बांधण्यासाठी 17 वर्षांचा कालावधी लागला.
जगातील सर्वात खोल रेल्वे बोगदा हा स्वित्झरलँडमध्ये बांधण्यात आला आहे. त्याचे नाव गॉटार्ड बेस टनल आहे. या बोगद्याचे जगातील सर्वात लांब आणि सर्वात खोल रेल्वे बोगद्याच्या यादीत नाव आहे.
12.5 अब्ज डॉलर्स खर्च करून बनवलेला हा बोगदा बांधण्यासाठी 2600 लोकांनी काम केले. नेदरलँड्समधील रॉटरडॅम आणि इटलीमधील जेनोवा यांना जोडणाऱ्या या सर्वात खोल रेल्वे बोगद्यातून जाणाऱ्या गाड्यांचा वेग आश्चर्यकारक आहे. या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 200-220 किमी आहे.
स्वित्झर्लंडमध्ये बांधलेला हा बोगदा खोली आणि लांबी दोन्ही बाबतीत सर्वोत्तम आहे. या बोगद्याची लांबी 57.09 किलोमीटर आहे. या बोगद्याने जपानच्या 53.9 किमी लांबीच्या सेकान बोगद्यालाही मागे टाकले आहे. तसंच, युके आणि फ्रान्सला जोडणाऱ्या 50.5 किमी लांबीच्या चॅनेल टनेललादेखील मागे टाकले आहे.
हा बोगदा स्विस आल्प्स पर्वतरांगाखालून जातो. त्याच्या मदतीने झुरिच ते मिलान हा प्रवास फक्त ३ तासांत पूर्ण होतो. पूर्वी हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ४ तास लागत होते.
प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त, दररोज सुमारे 260 मालगाड्या देखील या बोगद्यातून जातात. या बोगद्यातून जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 250 किलोमीटर आहे. गोथहार्ड बेस टनेल केवळ मालवाहतुकीसाठी आहे. या बोगद्यामुळे गाड्यांचा वेळ तर वाचतोच पण वाहतुकीचा खर्चही वाचतो. या रेल्वे मार्गाद्वारे माल वाहतुकीचा खर्च कमी होतो. प्रदूषण कमी झाल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत आहे.