PHOTOS

आँखो मे तेरी...; BAFTA पुरस्कारांमध्ये दीपिकाच्या साडी लूकवर सगळेच फिदा

Deepika Padunkone BAFTA : मागच्याच वर्षी दीपिका पदुकोणनं ऑस्करच्या मंचावर हजेरी लावली. त्यानंतर आता ही अभिनेत्री बाफ्टाच्या मंचावरही पोहोचली. 

 

Advertisement
1/7
दीपिका
दीपिका

BAFTA 2024 या पुरस्कार सोहळ्यामध्ये दीपिका प्रेझेंटर म्हणून व्यासपीठावर आली आणि अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला. आपल्या कलेच्या आणि कार्यक्षमतेच्या बळावर तिनं आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचं प्रतिनिधित्व केलं. 

 

2/7
साडीतलं सौंदर्य
साडीतलं सौंदर्य

बाफ्टा पुरस्कार सोहळ्यासाठी दीपिकानं आयव्हरी रंगाच्या एका चमकदार साडीला पसंती दिली होती. वेळी दीपिकानं डेविड बेकहम आणि दुआ लिपासोबत स्टेज शेअर केला. 

 

3/7
दीपिकाचा उठावदार लूक
दीपिकाचा उठावदार लूक

कोणत्याही ज्वेलरीशिवायच दीपिकाचा हा लूक अधिक उठावदार दिसत होता. नेटकरी तिच्या या लूकनं घायाळच झाले. 

4/7
दीपिकावर सर्वांच्या नजरा
दीपिकावर सर्वांच्या नजरा

सोशल मीडियावर दीपिकानं तिच्या या लूकचे फोटो शेअर केले. जिथं तिच्या साडीवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. कटस्लीव्ह ब्लाऊज, हाय हिल्स, मेसी बन असा तिचा एकंदर लूक होता. 

 

5/7
लूकला चार चाँद
 लूकला चार चाँद

डोळ्यांसह ओठांवरही लाईट शेडची लिपस्टीक आणि न्यूड मेकअपमुळं दीपिकाचं नैसर्गिक सौंदर्य तिच्या लूकला चार चाँद लावत होतं. 

6/7
अभिमानाचा क्षण
अभिमानाचा क्षण

दीपिकानं बाफ्टामध्ये जोनाथन ग्लेझरला पुरस्कार देत सन्मानित केलं. या मंचावर दीपिकाचं असणं अनेक चाहत्यांना कमालीचा आनंद देऊन गेलं. 

 

7/7
चाहते घायाळ
चाहते घायाळ

(सर्व छायाचित्रे सौजन्य- सोशल मीडिया) 





Read More