मंगळावारी 'पद्मावत' चित्रपटासाठी पहिले खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यामध्ये चित्रपटातील कलाकारांसोबत दिग्दर्शक संजय लीला भंसाळी, सोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पोहचले होते.
या चित्रपटामध्ये रणवीर आणि दीपिकाचा एकही सीन एकत्र नाही.
स्क्रिनिंगला दीपिका आणि रणवीर हातात हात घालून एकत्र आले होते.
कलर कोर्डिनेशन करत दीपिकाने सफेद अनारकली तर रणवीर सिंहने सफेर रंगाचा कुर्ता घातला होता.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहचली होती.
पद्मावत चित्रपटात शाहीद कपूर महाराज रवल रतन सिंह या भूमिकेत झळकणार आहे. शाहीदसोबत त्याची पत्नी मीरा राजपूत स्क्रिनिंंगला आली होती. दोघेही मॅचिंंग करत 'काळ्या' रंगाचा ड्रेस घालून आले होते. (फोटो साभार बॉलीवुड लाइफ डॉट कॉम)
शाहीद कपूर आपल्या परिवारासह या खास स्क्रिनिंगला पोहचला होता. शाहीद सोबत त्याची पत्नी, भाऊ ईशान खट्टर, आई नीलिमा आजमी हजर होती.
(फोटो साभार बॉलीवुड लाइफ डॉट कॉम)
पद्मावत चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे . ( फोटो साभार : ट्विटर)