Eknath Shinde Visit Shop Started From Ladki Bahin Yojana Money: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच या स्टॉलला भेट दिल्याचे फोटो शेअर करताना एका दिवसाला ही महिला किती कमाई करते याबद्दलचीही माहिती दिलीये. नेमकं काय म्हणालेत शिंदे आणि ही महिला दिवसाला किती कमाई करते ते पाहूयात..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक या 'लाडकी बहीण' स्टॉलवर पोहचले. त्यांनी या स्टॉलच्या भेटीसंदर्भात आणि ही महिला दिवसाला किती पैसे कमावते याबद्दल काय म्हणालेत ते पाहूयात...
'लाडकी बहिण' योजनेला एक वर्षे पूर्ण होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील योगिता खेवटकर या महिलेने योजनेच्या माध्यमातून सुरु केलेल्या स्टॉलला भेट देऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली.
योगिता ताईंनी लाडकी बहिण योजनेतून आलेल्या पैशांच्या साथीने ठाण्याच्या चंदनवाडी येथे 'लाडकी बहिण टी स्टॉल आणि नाष्टा सेंटर' सुरू केले आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'लाडकी बहिण टी स्टॉल आणि नाष्टा सेंटर'वरील कामात योगिता यांचे कुटुंबीय देखील त्यांची खंबीरपणे साथ देतात.
नुसते 1500 रुपये देऊन काय होतं असे म्हणणाऱ्या विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे उदाहरण आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
योगिता खेवटकर यांनी सुरु केलेला हा स्टॉल म्हणजे लाडकी बहिण योजनेची ताकद आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
योगिता खेवटकर यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मला पाहून या भगिनीच्या डोळ्यात अश्रू तरळले, असंही एकनाथ शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.
तेव्हा योगिता खेवटकर यांना धीर देत ही घोडदौड अशीच पुढे चालू ठेवा असे सांगितले, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे देखील याप्रसंगी सांगितल्यांचं शिंदेंनी नमूद केलं आहे.
या स्टॉलवरुन योगिता खेवटकर दर दिवशी हजार ते बाराशे रुपयांचा व्यवसाय त्या करतात, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. म्हणजेच महिन्याला ही महिला 30 हजार रुपये ते 36 हजार रुपयांपर्यंत कमाई या स्टॉलच्या माध्यमातून करते. (सर्व फोटो एकनाथ शिंदेंच्या फेसबुकवरुन साभार)