PHOTOS

Operation Sindoor अतर्गंत DGMO ने दाखवलं पाकिस्तानमधील विध्वंसाचे पुरावे; सरगोधा, नूर खानसह उद्ध्वस्त केले तळ, पाहा Satellite Photo

Pakistan Airbase Satelite Imgae : गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव थोडा कमी झाला आहे. पण, ते अजून संपलेले नाही. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माहिती देणारी पत्रकार परिषद डीजीएमओ यांनी पाकिस्तानमधील विध्वंसाचे उपग्रह फोटो दाखवले. 

Advertisement
1/10

भारताने त्यांच्या लष्करी प्रतिष्ठानांवर आणि हवाई तळांवर अचूक हल्ले केल्याचे पाकिस्तान सातत्याने नाकारत येत आहे. मात्र भारताने त्याबद्दलचे उपग्रह फोटो दाखवून पोकळ दावे उघड केले आहेत. चिनी कंपनी मिजाजव्हिजनने मिळवलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये पाकिस्तानच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक हवाई तळांपैकी एक असलेल्या नूर खान हवाई तळाचे नुकसान तुम्हाला पाहिला मिळतील. उपग्रह प्रतिमांमध्ये घटनास्थळी उद्ध्वस्त पायाभूत सुविधा आणि ग्राउंड सपोर्ट वाहने पाहिला मिळतात. 

2/10

भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान हादरला असून रावळपिंडीतील नूर खान एअरबेस पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाजवळ आहे. ते या फोटोमध्ये दिसत आहे. 

3/10

पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेतील कमतरता आणि तिचे संरक्षण करण्यास शेजारील देशाची असमर्थता उघडकीस आणली आहे. 

4/10

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठे नुकसान झाले. ज्यामुळे पाकिस्तान तेथून हल्ले करू शकला नाही. त्याच्या संरक्षण आस्थापनांनाही धोरणात्मक धक्का बसला पाहिला मिळतो. 

5/10

पाकिस्तानच्या जेकबाबाद एअरबेसचेही नुकसान पाहू शकता. एका भारतीय कंपनीने (कावास्पेस) प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये जेकबाबाद एअरबेसवरील नुकसान दिसून आले आहेत. छायाचित्रांनुसार, एअरबेसच्या मुख्य एप्रनवरील हँगर उद्ध्वस्त झाला आहे, तर एटीसी इमारतीचेही नुकसान झाल्याचा संशय आहे.

6/10

 कावास्पेसमधील विविध प्रतिमा पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर झालेले नुकसान तुम्हाला पाहिला मिळेल. फोटोनुसार, एका हँगरचे नुकसान झाले दिसत आहे. 

7/10

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की जिथे हल्ला करण्यात येईल तिथे हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिशेने, संतुलित हल्ल्यात, आम्ही संपूर्ण पश्चिम आघाडीवरील त्यांचे हवाई तळ, कमांड सेंटर, लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. 

8/10

आम्ही ज्या ठिकाणी हल्ला केला त्यात चकलाला, रफिक, रहीम यार खान, सुक्कुर, चुनिया, पसरूर यांचा समावेश आहे. ज्यामुळे आक्रमकता खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

9/10

यानंतर, सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद येथे हल्ले करण्यात आले. या तळांवर आणि इतरत्र प्रत्येक प्रणालीला लक्ष्य करण्याची क्षमता आमच्याकडे आहे.

 

10/10

पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घोष म्हणाले की, आम्ही आणखी एक हॉटलाइन संदेश पाठवला आहे, ज्यामध्ये आम्ही या उल्लंघनांचा उल्लेख केला आहे आणि हे स्पष्ट केले आहे की जर आज रात्री, नंतर किंवा कधीही असे पुन्हा घडले तर आम्ही त्याला कडक प्रत्युत्तर देऊ.





Read More