PHOTOS

Dhan Raj Yog 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर धन राज योग, 'या' राशीचे लोक होणार श्रीमंत?

Dhan Raj Yog 2023 : ग्रह उदय आणि अस्त याचा लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ग्रह गोचरमुळे अनेक योग तयार होतात. ग्रह आणि नक्षत्रांच्या संयोगाने धन राज योग तब्बल  50 वर्षांनंतर जुळून आला आहे. 

Advertisement
1/7
धन राजयोग
धन राजयोग

या धन योगामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर याचा परिणाम दिसून येणार आहे. पण काही राशींसाठी हा खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. 

2/7
वृषभ
वृषभ

या राशीच्या लोकांसाठी धन राजयोग उत्तम काळ घेऊन आला आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शश, मालव्य आणि लक्ष्मी योग जुळून आले आहेत. आर्थिक स्थितीसोबतच प्रगतीचे अनेक मार्ग खुले होणार आहे. 

3/7
मकर
मकर

या राशीच्या लोकांसाठी धन राजयोग खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात त्यांना यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

4/7
कुंभ
कुंभ

या राशीच्या लोकांसाठी धन राजयोग भाग्यवान ठरणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग उघड होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. मात्र या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. 

5/7
मिथुन
मिथुन

या राशीच्या लोकांना धन राजयोग धनवान बनवणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. या राशीच्या कुडंलीत हंस राज योगदेखील तयार होत आहे. 

6/7
धनु
धनु

या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली ठरणार आहे. या राशीवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. शेअर मार्केटमधील केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. मालमत्ता आणि वाहने खरेदीचे योग आहेत. 

7/7
कन्या
कन्या

या राशीसाठी धन राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. अडकलेले पैसे मिळणार आहेत. नोकरदार वर्गाला पगारवाढ आणि बढतीची संकेत आहेत. हा राजयोग या राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती करणारा ठरणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

 





Read More