4 Leaders Likley To Replace Dhananjay Munde In Devendra Fadnavis Cabinet: धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार यासंदर्भात चार नावं समोर येत आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातील चौघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. या चौघांपैकी एकाची वर्णी धनंजय मुंडेच्या जागी लागणार आहे. हे चौघे कोण आहेत ते पाहूयात...
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर यांच्याऐवजी आता पक्षाकडून कोणाला मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार? अशी चर्चा सुरु झाली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळीक असल्याने धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागाला आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा आपण स्वीकारला असून तो पुढे मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आल्याने त्यांच्या जागी अजित पवारांच्या पक्षातील कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं असतानाच अजित पवारांच्या पक्षातील चार नेत्यांची नावं मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आघाडीवर आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...
धनंजय मुंडेची मंत्रिमंडळात जागा घेण्याच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे. मंत्रिमंडळविस्तारात त्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज होते. ही नाराजी दूर करण्याचीही संधीही या माध्यमातून पक्षाला मिळाली आहे.
छगन भुजबळांबरोबरच अजित पवारांच्या पक्षातील अनिल पाटील यांचं नावही धनंजय मुंडेंची रिप्लेसमेंट म्हणून चर्चेत आहे.
अजित पवारांच्या पक्षातील नेते आणि आमदार प्रकाश सोळंके यांचं नावही धनंजय मुंडेंच्या जागी संधी मिळू शकते असा संभाव्य नेत्यांमध्ये.
धनंजय मुंडेंची जागा घेऊ शकतात अशा नेत्यांमध्ये आमदार संजय बनसोडे यांचं नावं चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे.
या चार नेत्यांपैकी एका नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षांतर्गत या नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.