PHOTOS

Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

Dharmendra on Bobby Deol: Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भुमिका केली आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा आहे. धर्मेंद्र यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिला असून यावेळी त्यांनी बॉबी देओलच्या अभिनयावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Advertisement
1/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

सध्या Animal या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. यावेळी या चित्रपटातील बॉबी देओल यांची भुमिकाही गाजली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीही त्याच्या या भुमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

2/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

हिंसा, लैंगिकता, खून, मारामारी, अर्वाच्य भाषा अशा सर्व मसाल्यांनी भरलेल्या Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं फारच कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटानं छप्परफाड कमाई केली आहे. 

3/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

बॉबी देओलनं खलनायकाची भुमिका या चित्रपटातून केली आहे. याला या चित्रपटात त्याला एकही संवाद नाही. परंतु त्याच्या अॅक्शन सीन्सनं यावेळी सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. 

4/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

बॉबी देओलनं 90 च्या दशकात अनेक लोकप्रिय आणि बिग बजेट चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यातून गेल्या काही वर्षांपासून त्याची 'आश्रम' ही वेबमालिकाही प्रचंड गाजते आहे. या वेबमालिकेचे 3 सिझन प्रदर्शित झाले आहेत. आता त्याच्या Animal या चित्रपटाची चर्चा आहे. 

5/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

यावेळी 'फिल्मीबीट'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलनं याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ''माझे वडील एक मोठी आणि महान व्यक्ती आहे. जेव्हा त्यांच्यासारखा माणूस माझ्याबद्दल बोलतो तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होता. त्यांनी केलेलं कौतुक ही मला मिळालेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी पावती आहे. मी फक्त माझ्या वडिलांवर प्रेम करतो. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा ते आपल्या फोनवर इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडीओ पाहत होते.'' 

6/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

त्यापुढे बॉबी देओलनं सांगितलं की, ''तेव्हा ते मला म्हणाले की, 'तू पाहून सगळे वेडे झाले आहेत. वेड लावलंय तू सगळ्यांना' तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'हो, पापा. मी तुमचा मुलगा आहे. तेव्हा सगळ्यांना वेड तर लागणारच. त्या सगळ्यांना माझ्यावर अभिमान वाटतो आहे आणि सगळेच आनंदी आहेत.'''

7/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

बॉबी देओलच्या या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. त्याचसोबत भाऊ आणि अभिनेता सनी देओलनंही कौतुक केले आहेत. सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपटही यावर्षी प्रचंड गाजला होता. 

8/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

बॉबी देओलच्या या चित्रपटातील भुमिकेवरून अनेक जणं त्याच्यावर टीकाही करताना दिसत आहेत. यावेळी त्याच्या या भुमिकेबद्दल काहींनी निराशाही व्यक्त केली आहे. 

9/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर स्टारर या चित्रपटानं 12 दिवसात 450 कोटीहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटानं 750 हूनही अधिक गल्ला भरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यानं केलं आहे. या चित्रपटाचा पुढील भागही येणार आहे. 

Read More