ण 6 मुले आहेत - दोन मुलं आणि चार मुली. आज आम्ही तुम्हाला धर्मेंद यांच्याबद्दल नाही, तर त...
धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांना दोन मुले आणि चार मुली आहेत. त्यांना दोन मुलं असून त्यांची नावे सनी आणि बॉबी देओल आहेत, तसेच आता त्यांच्या मुली आणि जावयांबद्दल अनेकांना अधिक माहिती नाहीये तर पाहूयात काय करतात धर्मेंद्र यांचे जावई?
धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केले. या लग्नातून त्यांना चार मुलं झाली - सनी, बॉबी, अजीता आणि विजेता देओल.
अजीता देओल ही एक शिक्षिका आहे आणि अमेरिकेतील शाळेत मानसशास्त्र शिकवते. तिचे लग्न भारतीय-अमेरिकन दंतवैद्य(Dentist) किरण चौधरी यांच्याशी झाले आहे. अजीता आणि किरण यांना दोन मुली, निकिता आणि प्रियंका चौधरी आहेत.
धर्मेंद्र यांची प्रोडक्शन कंपनी 'विजेता प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड' ही त्यांची मुलगी विजेताच्या नावावर आहे. विजेताचे लग्न विवेक गिलशी झाले असून त्यांनाही दोन्ही मुलं आहेत - साहिल आणि प्रेरणा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजेता तिच्या कुटुंबासोबत दिल्लीत राहते आणि 'राजकमल होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न 1980 मध्ये झाले. हेमा यांच्याशी दुसरे लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला, कारण प्रकाश कौरने घटस्फोट देण्यास नकार दिला. या लग्नातून त्यांना दोन मुली - ईशा आणि अहाना आहेत.
ईशा देओलने 2012 मध्ये उद्योगपती भरत तख्तानीशी लग्न केले. भरत आणि त्याचे कुटुंबीय 'आरजी बँगल्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी चालवतात. मात्र, ईशा आणि भरत यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांनी 12 वर्षांनंतर म्हणजेच 2024 मध्ये घटस्फोट घेतला.
हेमा आणि दर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओल हिचे लग्न दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोहराशी झाले आहे. या जोडप्याला जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे - अस्त्राया, आदिया आणि डारियन.