PHOTOS

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीचं सौंदर्यच तिच्यासाठीच ठरलं अभिशाप; चेहरा पाहताच नकार द्यायचे दिग्दर्शक

ेत्रीविषयी आज इथं जाणून घेणार आहोत, ज्या अभिनेत्रीला तिच्या सावळ्या नव्हे, तर गोऱ्यापान वर्णामुळं, तिच्या सौंदर्यामुळं अनेक अडचणींचा सा...

Advertisement
1/8
मिस एशिया पॅसिफिक
मिस एशिया पॅसिफिक

मिस एशिया पॅसिफिक हा किताब मिळवणाऱ्या या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे लाखो चाहते. या अभिनेत्रीचे वडील जर्मन आणि आई बंगाली आहे. बालपणापासूनच तिचं रुप चारचौघात उठून दिसेल असं होतं. 

 

2/8
सौंदर्य
सौंदर्य

सौंदर्याच्या बळावर ती सौंदर्यवती अभिनेत्री झाली खरी. पण, तिच्या वाट्याला अपेक्षित भूमिका कधीच आल्या नाहीत. अनेक पात्रांसाठी तिचं सौंदर्यच अडचणीचं ठरत होतं, ज्यामुळं तिला अनेकदा दिग्दर्शकांनी स्पष्ट नकार दिला होता. 

 

3/8
अनेकांचा विश्वास बसणार नाही
अनेकांचा विश्वास बसणार नाही

कोणा एका अभिनेत्रीला सौंदर्यामुळं अडचणींचा सामना करावा लागला यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरंय आणि ही अभिनेत्री याचंच एक उदाहरण. ही आहे, दिया मिर्झा. तुझा लूक 'मेन स्ट्रीम' आहे असं सांगत तिला अनेक दिग्दर्शकांनी भूमिका नाकारल्या. 

4/8
करिअर
करिअर

दियानं 2001 मध्ये  'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातून कलाविश्वात करिअरची सुरुवात केली. दियानं अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या, पण कारकिर्दीतील संघर्षाचा काळही ती विसरलेली नाही. 

 

5/8
मेनस्ट्रीम
मेनस्ट्रीम

एका मुलाखतीत दियानंच सांगितल्यानुसार अनेकदा अपेक्षित भूमिका तिला मिळल्या नाहीत, कारण दिग्दर्शकांना ती कायम मेनस्ट्रीम अभिनेत्रीच वाटत होती.

 

6/8
चित्रपट गमावले
चित्रपट गमावले

परिणामी दियानं अनेक मोठे चित्रपट गमावले आणि हीच बाब तिच्या कारकिर्दीसाठी धोकादायक सिद्ध झाली. 

 

7/8
दियाची ओळख
दियाची ओळख

दिया लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. ज्यानंतर तिच्या आईनं हैदराबादच्या अहमद मिर्झा यांच्याशी निकाह केला. त्यांनी दियाला स्वत:च्या मुलीसारखं प्रेम दिलं आणि म्हणूनच दिया तिच्या सावत्र वडिलांचं नाव आपल्या नावाशी जोडते. 

 

8/8
साचेबद्ध भूमिकांना शह
साचेबद्ध भूमिकांना शह

दियानं कायमच साचेबद्ध भूमिकांना शह दिला. बाईक राईड असो किंवा मग पर्यावरणाविषयीची जागरुकता असो, दिया नेहमीच तिचं वेगळेपण विविध माध्यमांतून सिद्ध करताना दिसली. 

 





Read More