PHOTOS

दिया मिर्झाला सावत्र मुलगी कधीच नाही म्हणत 'आई'; स्वत:च खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...

Dia Mirza relation with her step daughter : दमदार कथानकं निवडून त्यांना आपल्या अभिनयातून जीवंत करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झानं गेला बराच काळ तिच्या व्यक्तिगत जीवनाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. 

Advertisement
1/7
लग्नाच्या काही दिवसांनंतरच...
लग्नाच्या काही दिवसांनंतरच...

2021 मध्ये दियानं व्यावसायिक वैभव रेखी याच्याशी विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्नाच्या काही दिवसांनंतरच दियाला मातृत्त्वाची चाहूल लागली आणि तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. अवयान आझाद रेखी असं या मुलाचं नाव. 

 

2/7
नातं एका आनंदी वळणावर सुरु केलं
 नातं एका आनंदी वळणावर सुरु केलं

वैभवनं पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर दियासोबतचं नातं एका आनंदी वळणावर सुरु केलं होतं. वैभवला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून, समायरा असं तिचं नाव. दिया मिर्झाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे फोटो आतापर्यंत अनेकांनीच पाहिले असतील. 

3/7
तिचं आणि तिच्या सावत्र मुलीचं नातं
तिचं आणि तिच्या सावत्र मुलीचं नातं

हल्लीच एका मुलाखतीदरम्यान दियानं तिचं आणि तिच्या सावत्र मुलीचं नातं नेमकं कसं आहे यावरून पडदा उचलला. समायरा आपल्याला कधीच 'आई' न म्हणता ती थेट नावानंच हाक मारते, असं तिनं सांगितलं. 

4/7
नात्यांमध्ये स्थैर्य
नात्यांमध्ये स्थैर्य

Dia Mirza relation with her step daughter : दियानं खासगी जीवनात बरेच चढ-उतार पाहिले आणि त्यानंतर बराच काळ लोटला अन् या अभिनेत्रीला खासगी नात्यांमध्ये स्थैर्य लाभलं. 

5/7
'तिनं मला कधीच...'
'तिनं मला कधीच...'

'तिनं मला कधीच आई म्हटलं नाही. मुळात तिनं मला आई, मम्मा किंवा मम्मी म्हणून हाक मारावी अशी माझीही अपेक्षा नाही. तिची एक आई आहे, जिला ती आई, मम्मा म्हणून हाक मारते. मला मात्र ती दिया म्हणूनच हाक मारते', असं दिया म्हणाली. 

 

6/7
समायराचे आभार
समायराचे आभार

समायराचे आभार मानत तिच्यामुळं आपला मुलगा अवयानही आपल्याला दिया म्हणूनच हाक मारतो असंही तिनं मुलाखतीदरम्यान उत्साहात सांगितलं. त्याच्या तोंडून दिया मॉम ऐकणं खूपच गोड वाटतं, असं म्हणत दियानं तिचा आनंद व्यक्त केला. 

7/7
दियाचा मुलगा
दियाचा मुलगा

दियाचा मुलगा अवयान जेव्हा बोलू लागला होता तेव्हा त्यानं बरेच शब्द आधी म्हणण्यास सुरुवात केली. पण, 'माँ' मात्र तो फार उशिरा बोलला होता. हे सांगताना आपल्या पतीनं लेकानं पहिल्यांदा आई म्हटलं तो क्षण रेकॉर्ड केल्याचंही तिनं सांगितलं. 





Read More