PHOTOS

डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, आत्ताच सावध व्हा!

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही माहिती असणे खूप गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांना आपल्याला डायबिटीस झालाय हे समजेपर्यंत त्यांची तब्येत बिघडलेली असते. अशावेळी तुम्हाला आधीच लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे. 

Advertisement
1/8
डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, आत्ताच सावध व्हा!
  डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, आत्ताच सावध व्हा!

मधुमेह होण्याआधी शरीरात अनेक प्रकारची लक्षणे असतात. ही लक्षणे कोणती हे आज जाणून घेऊयात. कॅनडाचे डॉक्टर शिबोन डेशोअल यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी ही माहिती दिली आहे

2/8

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना सारखी लघवी ( Frequent Urine) येते. थोड्या थोड्यावेळाने त्यांना लघवीसाठी वॉशरुमला पळावे लागते. या अवस्थेला पॉलीयूरिया असं म्हणतात.

3/8

एकॅनथोसिस निग्रीकॅन्स ही अशी अवस्था आहे. ज्यात त्वचेवर गडद आण वेलवेटप्रमाणे निशाण पडतात. हे निशाण साधारणपणे मान, काखेत किंवा प्रायव्हेट पार्ट्सच्या जवळपास दिसतात. हे (Insuline Resistance Sign) चे निशाण असतात. 

4/8

 मधुमेह झाल्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. मधुमेहामुळं बॅक्टेरिया वाढतो आणि त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती कमी होते. यामुळं यीस्ट इन्फेक्शन आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकते. 

5/8

शरीरात हाय ब्लड शुगर होण्याने स्टिफ हँड सिंड्रोम होऊ शकतो. तुम्ही हात जोडल्यानंतर हात योग्यरितीने जोडता येत नाही. 

6/8

नसा डॅमेज झाल्यामुळं हात-पाय सुन्न होऊ लागतात. नसा सुन्न पडल्यामुळं व्यक्तीला योग्यरितीने चालता येत नाही. यामुळं तणाव वाढतो आणि जखम होण्याची शक्यता असते.

7/8

पाय सुन्न पडल्यामुळं व्यक्तीला जखम होऊ शकते. हाय ब्लड शुगरमुळं जखम लवकर भरत नाही. खराब ब्लड फ्लोमुळं बॅक्टेरिया वाढतो आणि पायात इन्फेक्शन वाढते. 

8/8

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 





Read More