PHOTOS

प्राजक्ता माळी किती श्रीमंत? दागिन्यांच्या ब्रॅण्डची मालकीण, कर्जतचं फार्महाऊस; एकूण संपत्ती...

Prajaktta Mali Net Worth Property Details: अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या भाजपाच्या एका आमदारामुळे चर्चेत आहे. तिने स्वत: पत्रकारांशी बोलताना या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. असं असतानाच आता या हरहुन्नरी अभिनेत्रीची संपत्तीही चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्ताची एकूण संपत्ती आहे तरी किती पाहूयात...

Advertisement
1/13

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या बरीच चर्चेत असतानाच तिची नेमकी किती संपत्ती आहे याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या प्राजक्ता एका चित्रपटासाठी किती पैसे मानधन म्हणून घेते? तिची एकंदरित संपत्ती किती आहे याबद्दल जाणून घ्या...

2/13

भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी एका राजकीय प्रकरणावरुन भाष्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीबरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्री स्मृती मंधानाचा नावं घेतल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

3/13

अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली. तसेच या प्रकरणी आपण महिला आयोगाकडे तक्रार केल्याचंही म्हटलं आहे. प्राजक्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यासंदर्भात भेटल्याचे समजते.

4/13

या प्रकरणामुळे प्राजक्ता चर्चेत असतानाच तिच्यासंदर्भातील अनेक गोष्टींबद्दल इंटरनेटवर सर्च होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्राजक्ताची संपत्ती किती? तिचं फार्म हाऊस कुठे आहे वगैरेबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे. याचनिमित्ताने नजर टाकूयात तिच्या संपत्तीवर...

5/13

प्राजक्ता माळीने 'पांडू', 'डोक्याला शॉट', 'मणिकर्णिका : द क्विन ऑफ झाशी', 'फुलंवंती' आणि इतर चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

6/13

मात्र प्राजक्ताला खरी ओळख मिळाली ती 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमधून. संगीत मानपमान हा प्राजक्ताचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आहे.

 

7/13

प्राजक्ताने मराठी इंडियन आयडलमध्ये अँकर म्हणून पहिल्यांदा अँकरींगची जबाबदारी पेलली. प्राजक्ताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अँकरींगच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिने 2022 मध्ये 'रानबाझार' या वेब सिरीजमधून ओटीटीवर एन्ट्री घेतली.

8/13

प्राजक्ता एका चित्रपटासाठी किती मानधन घेते असा प्रश्न पडला का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 15 ते 20 लाख रुपये! अभिनयाबरोबरच प्राजक्ता दिग्दर्शनही करते. तिने चित्रपट, मालिका आणि सिरीअलचं दिग्दर्शन केलं आहे.

9/13

प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिचे इन्स्टाग्रामवर 22 लाख 78 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिथे ती तिच्या फोटोशूटचे व्हिडीओ, भटकंतीचे फोटो पोस्ट करुन चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

10/13

प्राजक्ता अनेक मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहे. यामध्ये चंदू काका सराफ ज्वेलर्स, गोविंद दूध, बिग बाझार, कसाट साडी यासारख्या अनेक ब्रॅण्डसाठी प्राजक्ताने काम केलं आहे. 

 

11/13

प्राजक्ताने तिच्या दागिण्यांचा प्राजक्तराज नावाचा ब्रॅण्डही लॉन्च केला आहे. ती सोनं, चांदी आणि कॉपरची लॅमिनेटेड ज्वेलरी विकते.

 

12/13

कर्जतला प्राजक्ताचं एक मोठं फार्महाऊस आहे. 3 बीएचकेचं हे फार्महाऊस 15 ते 20 लोकांच्या पिकनिकसाठी उत्तम आहे. प्राजक्तकुंज असं या फार्महाऊसचं नाव आहे.

 

13/13

एका रिपोर्टनुसार 2022 मध्ये प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती ही 16 ते 40 कोटी रुपयांदरम्यान होती. आता यामध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे.





Read More