PHOTOS

Aadhaar Card वरील नाव, लिंग आणि वाढदिवसात किती वेळा बदल करता येतो माहितीये का?

Update Aadhaar Card Details: आधारकार्ड हे भारतामधील सर्वात महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. मात्र आधारकार्डवरील माहिती अनेकदा वेगवेगळ्या कारणाने बदलावी लागते. मात्र असा बदल करण्याच्या संधी मर्यादीत आहेत हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊयात किती वेळा नेमकी तुम्हाला आधारकार्डवरील माहिती बदलता येते याबद्दल... 

Advertisement
1/7

युनिक आयडेंटीफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधारकार्डसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

2/7

आधारकार्डवरील नाव, वाढदिवस आणि लिंग या गोष्टींसंदर्भात नेमके कितीवेळा बदल करण्याची मुभा आहे? याचं उत्तर युआयडीएआयने दिलं आहे.

 

3/7

आधारकार्डवरील नाव जास्तीत जास्त दोन वेळा बदलता येईल असं युआयडीएआयने म्हटलं आहे. 

 

4/7

तर आधारकार्डधारक व्यक्तीला आधारकार्डशी संलग्न रेकॉर्डमध्ये Sex म्हणजे व्यक्ती महिला आहे की पुरुष आहे हे एकदाच बदलण्याची मूभा आहे.

 

5/7

आधारकार्डवर नोंद असलेली डीओबी म्हणजेच वाढदिवसाची तारखी बदलण्यासाठीही मर्यादा आहे.

 

6/7

आधारकार्ड असलेल्या व्यक्तीला आयुष्यात एकदाच वाढदिवसाची तारीख बदलण्याची भूमा देण्यात आल्याचं युआयडीएआयने म्हटलं आहे.

7/7

सामान्यपणे आधारकार्डवर या गोष्टी फार क्वचित बदलल्या जात असल्याने त्यासाठी मर्यादा घालण्यात आल्याचं समजतं.

 





Read More