तेजस्विनी पंडित कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटात ती झळकली आहे. इतकंच नव्हे तर तिची आई ज्योती चांदेकर यादेखील ज्येष्ठ व लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर अनेकदा अॅक्टिव्ह असते. तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफबाबतही फोटो शेअर करत असते.
तेजस्विनीच्या सोशल मीडियावर तिने तिच्या बहिणीसोबतही फोटो शेअर करत असते. आज आपण तिच्या बहिणीबद्दल जाणून घेऊयात.
तेजस्विनीला सख्खी मोठी बहीण आहे. दोघींच्या चेहऱ्यातही बरेच साम्य आहे.
तेजस्विनीच्या बहिणीचं नाव पूर्णिमा आहे. तेजस्विनीने दोघींचे दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत.
दिवाळीत तेजस्विनीने एक पोस्ट शेअर करत आमच्या घरी लक्ष्मी आली असं म्हटलं होतं. तेजस्विनीच्या बहिणीला दिवाळीतच मुलगी झाली आहे.
लग्नाच्या 14 वर्षांनी तेजस्विनीच्या बहिणीला मुलगी झाली. यानंतर तिने एक खास पोस्टदेखील लिहली होती.
तेजस्विनीच्या बहिणीचे पूर्ण नाव पूर्णिमा पुल्लन असं आहे. तर विनीत पुल्लन असं तेजस्विनीच्या जिजूंचे नाव आहे.