PHOTOS

Deo आणि Perfume मध्ये नेमका फरक काय? कोणता पर्याय सर्वोत्तम?

Difference Between Deo And Perfume: प्रत्यक्षात मात्र डिओ आणि परफ्युममध्ये फरक असून त्वचेसाठीसुद्धा यातील एक प्रकार धोक्याचाही ठरु शकतो. तो कोणता? पाहा... 

 

Advertisement
1/9
सुगंधी द्रव्य
सुगंधी द्रव्य

Difference Between Deo And Perfume: कुठे बाहेर जायचं म्हटलं किंवा सहजत अंघोळीनंतर किंवा एखाद्या प्रसंगी तजेलदार वाटण्यासाठी काही मंडळी सुगंधी द्रव्य अर्थात परफ्युमचा वापर करतात. 

2/9
परफ्युम
परफ्युम

एकेकाळच्या अत्तराची जागा आता परफ्युम आणि डिओनं घेतली आहे. मुळात या दोन्ही गोष्टी सुगंधी द्रव्याशी संबंधित असल्या तरीही त्या एकसारख्या नाहीत हे लक्षात घेणं महत्त्वाचं. 

 

3/9
दुर्गंधी
दुर्गंधी

घामानं येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी डिओड्रंटचा वापर करतात आणि काही डिओ घामामुळं वाढणाऱ्या विषाणूंना रोखण्यासही मदत करतात. त्यामध्ये हलका सुगंध मिसळलेला असतो त्यामुळं डिओ मारताच त्याचा गंध लक्ष वेधतो. 

 

4/9
एसेन्शिअल ऑईल
एसेन्शिअल ऑईल

डिओ फार काळ टीकत नाही. डिओमध्ये एसेन्शिअल ऑईलचं प्रमाण अतिशय कमी असल्या कारणानं तो सहसा बाह्यांमध्ये किंवा छातीच्या भागावर लावतात. 

 

5/9
परफ्युमचा वापर
परफ्युमचा वापर

परफ्युमचा वापर पूर्णपणे सुगंधासाठीच तेला जातो. या सुगंधी द्रव्यामध्ये साधारण 15 ते 30 टक्के एसेन्शिअल ऑईल किंवा अल्कोहोलची मात्रा असते. ज्यामुळं त्याचा गंध अधिक तीव्र असतो. 

 

6/9
परफ्युमचा सुगंध
परफ्युमचा सुगंध

परफ्युमचा सुगंध दीर्घ काळ टीकतो. सहसा परफ्यूमची किंमतसुद्धा डिओच्या तुलनेत अधिक असते. बऱ्याचदा हे द्रव्य कपड्यांवर, मानेवर, मनगटावर मारलं जातं आणि त्याचा सुगंध 6 ते 8 तासांसाठी टीकतो. 

7/9
सल्ला
सल्ला

परफ्युम थेट त्वचेवर मारण्याचा सल्ला मात्र दिला जात नाही. दोन्ही सुगंधी द्रव्यांचे वेगवेगळे फायदे असून, गरजेनुसारच त्यांचा वापर करणं योग्य. थोडक्यात दैनंदिन वापरासाठी डिओ आणि एखाद्या खास प्रसंगासाठी, कार्यक्रमासाठी मात्र परफ्युमच निवडावा.  

8/9
परफ्युमचे अनेक प्रकार...
परफ्युमचे अनेक प्रकार...

आजच्या घडीला डिओ आणि परफ्युमचे अनेक प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून, काही अत्तर विक्रेते अगदी तुम्हाला हव्या त्या वस्तूच्या सुगंधापासून अत्तर, परफ्युम तयार करून देतात. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)

9/9

(सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)

 





Read More