Improve Your Gut Health:पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे पचन प्रक्रिया योग्य होऊन शरीर निरोगी राहते. म्हणून, आपल्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास एकूण आरोग्याला फायदे होऊ शकतात.
पोटाशी संबंधित समस्यांमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. पोटात योग्य बॅक्टेरियांची कमतरता असल्यास पचनावर परिणाम होतो आणि विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि अन्न चांगल्या पद्धतीने पचवण्यासाठी पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पचनसंस्थेमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात, जे अन्न पचवण्यात मदत करतात. परंतु काही कारणांमुळे या बॅक्टेरियांची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. पोटातील बॅक्टेरियांचे संतुलन बिघडल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि मानसिक ताण, चिंता आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.
दही: दह्यात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि चांगले बॅक्टेरिया वाढतात. दही पचायाला हलके देखील असते.
घरगुती लोणचं हे प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत असू शकतं, जे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यास मदत करते.
सफरचंद, केळी, गाजर, ब्रोकोली आणि पालेभाज्या हे फायबरयुक्त पदार्थ पचन सुधारतात. त्यामुळे पचनामध्ये अडथळे निर्माण होत नाही.
इडली, डोसा, नाचणीच्या भाकरीसारखे पदार्थ पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात.
बीटरुट पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवून पचन सुधारते. बीट खाल्ल्याने शरीरातील रक्तही शुद्ध होते.
पुरेसे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)