Dinesh Karthik appointed as RCB batting coach : आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर मोठी जबाबदारी आली आहे.
इतके टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर मोहोर उमटवली तर दुसरीकडे विराट कोहलीला गुड न्यूज मिळाली आहे.
आरसीबीचा माजी स्टार फलंदाज दिनेश कार्तिक याने 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती.
दिनेश कार्तिक याने 1 जून रोजी अधिकृतपणे सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर होती. अशातच आता एका महिन्यातच कार्तिकला गुड न्यूज मिळालीये.
दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
आरसीबीमध्ये दिनेश कार्तिक अगदी नवीन अवतारात परतला. दिनेश कार्तिक फलंदाजी प्रशिक्षक आणि मेन्टॉर मार्गदर्शक असतील, असं आरसीबीने अधिकृतरित्या सांगितलं आहे.
दरम्यान, संघात खेळताना आरसीबीला ट्रॉफी जिंकून देऊ शकलो नाही. मात्र, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून यावेळी आरसीबी जिंकवणार, असा निर्धार डीकेने व्यक्त केलाय.