दाज दिनेश कार्तिक याने आगामी वर्ल्ड कपपूर्वी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यात येणार ...
कार्तिकने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. मी तामिळनाडूच्या निवडकर्त्यांना सांगू इच्छितो की, मी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध आहे. स्पर्धेत खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे, असं कार्तिक म्हणालाय.
विजय हजारे ट्रॉफी त्याचबरोबर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही खेळायचे आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळल्यानं पुढल्या वर्षीच्या आयपीएलची तयारी होईल, असंही दिनेश कार्तिक म्हणालाय.
मला व्हाईट बॉल क्रिकेटच्या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळायचं आहे जेणेकरून मी आयपीएलची तयारी करू शकेन, असं म्हणत कार्तिकने विश्वास व्यक्त केलाय.
नुकत्याच झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दिनेश कार्तिक कॉमेंट्री करताना दिसला होता. त्यानंतर त्याने कोणताही सामना खेळला नाही.
दरम्यान, कार्तिक शेवटच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही. अधूनमधून तो समालोचन करताना दिसतो.