Shisena MLA Disqualification: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या 16 आमदरांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असा हा निकाल असणार आहे. सत्ताधा-यांसोबत विरोधकांचीही धाकधूक वाढली आहे. निकालानंतर काय होणार याचे अंदाज राजकीय वर्तुळात लढवले जात आहे.
निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर ठाकरे गट पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा सुप्रीम कोर्टात दाद मागेल.
हे प्रकरण 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे सोपवलं जाईल.
आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाईल. तसं झाल्यास पुढील निवडणुकीपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असेल.
आमदारकी गेली तरी एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद अबाधित राहिल का? असा सवाल आहे. काहींच्या मते शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सहा महिन्यात आमदार म्हणून निवडून यावं लागेल. तर काहींच्या मते पुढील 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.
सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री शिंदेंना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर नव्यानं सरकार स्थापन करण्याचे सोपस्कार पार पाडावे लागतील.