बलिप्रतिपदेनंतर दुसरा सण येतो तो म्हणजे भाऊबीज. भावा-बहिणीच्या नात्याचा हा सण साजरा केला जातो.
भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो. आजच्या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही दारासमोर या सुंदर रांगोळ्या काढू शकता.
अनेकांना रांगोळ्यांच्या डिझाइन काढणे खूप कठिण जाते. अशावेळी हल्ली गोल झाकणं, पेन, चमचे हे साहित्य वापरुन डिझाइन काढली जाते.
तुम्हीदेखील भाऊबीजेच्या दिवशी दारात साधी व सोप्पी अशी रांगोळी काढू शकता
रांगोळीभोवती दिव्यांची आरास खूपच सुंदर दिसेल
रंगीबेरंगी फुलांची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेईल
साधी सोप्पी रांगोळी दिसायला खूपच सुंदर दिसते