Family Photos : कामात व्यग्र असणारी आणि सतत कुटुंबापासून दूर असणारी सेलिब्रिटी मंडळीही इथं अपवाद नाहीत.
भाडीपा फेम सारंग साठ्ये आणि पॉला ही मंडळीसुद्धा जगात भारी दिवाळी साजरी करत आहेत.
ते साजरी करत असलेली दिवाळी खऱ्या अर्थानं 'जगात भारी' आहे, कारण ते या सणाच्या निमित्तानं थेट वाराणासीला पोहोचले आहेत.
स्कॉटलंडची पॉला भारतात अशी काही रुळलीये, की ती पुणेकर, मुंबईकर आणि भारतीयसुद्धा झालीय असं म्हणणं अपवाद ठरणार नाही.
वाराणासीच्या या दिवाळीचा अनुभव घेण्यासाठी ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्यात्यांच्या कुंटुंबासह तिथं पोहोचली.
यंदाच्या वर्षी सारंग आणि पॉला यांनी ही दिवाळी त्यांच्या कुटुंबीयांसह खऱ्या अर्थानं खास अंदाजात साजरी केली असं म्हणायला हरकत नाही.
सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोला अनेकांनीच पसंतीसुद्धा दिल्याचं पाहायला मिळालं.
(सर्व छायाचित्र- सारंग साठ्ये/ इन्स्टाग्राम)