Diwali Rangoli Designs : सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, अशी ही प्रकाशाची दिवाळी आपल्या अंगणात आली आहे. दिवाळीचा हा आनंद आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी दारात काढा सुंदर आणि सोप्या अशा रांगोळी डिझाईन्स काढा. दारात येणारा प्रत्येक जण तुमच्या रांगोळीच्या प्रेमात पडेल.
प्रकाशाचा हा सण दिवाळी आली की, अंगणात रोषणाई, कंदील आणि पणत्यांनी सजवली जाते.
दिवाळीला लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पूजा असो किंवा कुठलंही शुभ कार्य रांगोळीशिवाय अपूर्ण आहे.
शुक्रवारी 1 नोव्हेंबरला दिवाळीचं लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत असणार आहे.
बिल्डिंग असो किंवा चाळ अगदी गावातील घरं रांगोळीशिवाय दिवाळीचा आनंद हा अपूर्ण असतो.
घरासमोर कितीही छोटी जागा असो सुरेख, सुंदर आणि अनेक रंगांची ही आकर्षिक रांगोळी सर्वांना मोहात टाकते.
दारोदारी दिव्यांची आराससोबत सुरेख रंगेबीरंगी रांगोळी पाहून मनं अगदी प्रसन्न होऊन जातं. (रांगोळी VIDEO - Rangoli Designs : वाह वाह क्या बात है! तुमच्या दारातील 'या' रांगोळी डिझाईन्स पाहुण्यांच्या मनाला घालतील भुरळ, पाहा VIDEO)
झटपट काढता येईल अशी सुंदर रंगोळीची डीझाईन तुम्हाला नक्की मदत करतील.
सोपी आणि झटपट फुलांची रांगोळी तुमच्या घराची शुभा नक्कीच वाढवतील.
पूर्वी ठिपक्यांची काढली जायची. आता संस्कार भारती आणि फुलांची रांगोळीचा ट्रेंड हल्ली खूप वाढलाय.
लक्ष्मी कुबेर पूजनाची हीच अप्रतिम लाखात एक रांगोळी प्रियजनांना नक्की आवडतील.