ice problem in freezer: उन्हाळ्यात प्रत्येकाला फ्रिजमधील थंड पाणी, दूध, थंड पेय आणि बर्फाचे तुकडे आवश्यक असतात. मात्र, अनेकदा फ्रिजमध्ये बर्फाचे डोंगर तयार होतात. ज्यामुळे कधीकधी फ्रिजचे दारही नीट बंद होत नाही. हे बर्फाचे डोंगर नेहमीच तयार होऊ लागल्याने अनेक समस्या निर्माण होतात. तुमच्याही फ्रिजमध्ये बर्फाचे डोंगर तयार होत असतील, तर हे उपाय नक्कीच तुम्हाला उपयोगात येतील.
उन्हाळ्यात प्रत्येकाला फ्रिजमधील किंवा माठीतील थंड पाणी प्यायला आवडतं. . फ्रिज उघडला की आपल्याला फ्रिजरमध्ये अनेकदा बर्फ साठलेला दिसतो. हे डोंगर अनेक वर्ष वापरत असलेल्या फ्रिजमध्ये दिसून येतात. तर अशा वेळेस काय करावे हा प्रश्नच पडतो . तुम्ही हे उपाय वापरून नक्कीच फ्रिजमधील हा बर्फाचा डोंगर काढू शकतात.
फ्रिज उघडला की बाहेरून गरम हवा आत शिरते ज्यामुळे ओलावा तयार होतो. ओलावा निर्माण होणे म्हणजेच बर्फ तयार होणे. म्हणूनचं फ्रिज उघडताना गरजेच्या वेळीच उघडा आणि शक्य असल्यास जितके दवे तेवढेच उघडा. तसेच दार उघडताना त्या दारावर जास्त भार देऊ नका. या सवयीमुळे ओलाव्याचे प्रमाण कमी होईल आणि बर्फ तयार होण्याची शक्यता कमी होईल.
फ्रिजच्या तापमानाची योग्य सेटिंग ही बर्फाच्या डोंगरांचा मुख्य कारण असू शकते. फ्रिजमध्ये 18 डिग्री सेल्सियस तापमान हे योग्य मानले जाते. या तापमानावर बर्फाचा साठा कमी होतो आणि खाद्यपदार्थही ताजे राहतात.
फ्रीज रिकामा ठेवल्यास तो जास्त ओलावा सोडू शकतो आणि बर्फ तयार होण्याची शक्यता वाढवते. शक्य असल्यास फ्रीज रिकामा न ठेवता त्यात खाद्य पदार्थ ठेवावे. यामुळे ओलाव्याचा त्रास कमी होऊन बर्फ जास्त साठणार नाही.
फ्रीजच्या मागील बाजूस एक पाईप असतो जे फ्रिजचे पाणी बाहेर काढण्याचे काम करतो. जर पाईपमध्ये अडथळा आलेला असेल तर ओलावा अधिक तयार होतो आणि बर्फ जास्त गोठतो. त्याचप्रमाणे फ्रीजच्या मागील बाजूस असलेला कॉईल कंडेन्सर जरी खराब असला तरी फ्रीज नीट काम करू शकत नाही. त्यामुळे यांची नियमितपणे स्वच्छता करणे महत्वाचे आहे.
फ्रीज उघडण्याने त्यात गरम हवा आणि ओलावा प्रवेश करतो. म्हणून किमान दिवसा फ्रिज उघडून बाहेरील ओलावा आत येऊ देऊ नका. फ्रीज उघडल्यावर आतल्या थंड हवेतून ओलावा मिसळतो. जो नंतर बर्फात रूपांतरित होतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाचं फ्रिजचा वापर करावा.
जर तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये असंख्य बर्फाचे डोंगर पाहत असाल तर ते अयोग्य तापमानाचे संकेत असू शकतात. त्या वेळी तापमान नियंत्रित करा आणि फ्रिजचा वापर योग्य पद्धतीने करा.
हे साधे आणि प्रभावी उपाय वापरून तुम्ही तुमच्या फ्रीजमधील बर्फाचे डोंगर कमी करू शकता. तसेच फ्रीजचे आयुष्यही वाढवू शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)