Double Chin Exercises: आजच्या चुकीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे अनेक समस्या मागे लागतात. या सवयींमुळे चेहऱ्यापासून संपूर्ण शरीरावर अतिरिक्त चरबी दिसून येते.
अयोग्य आहारामुळे अनेकांना डबल चीनचा त्रास दिसून येतो.
यामध्ये अनेकांच्या मानेभोवती चरबी जमा झालेली असते.
जर तुम्हाला चेहरा आणि मानेवर जमा झालेली चरबी काढून टाकायची असेल, तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत खूप सुधारणा कराव्या लागतील.
यावेळी सर्वात प्रथम सर्वप्रथम तुमचा आहार नीट घ्यावा लागणार आहे.
डबल चीन कमी करण्यासाठी रोज अर्धा तास योगा किंवा व्यायाम करा. यामुळे संपूर्ण शरीरातील चरबी कमी होईल.
यावेळी तुम्ही भुजंगासन करू शकता. हे रोज केल्याने चरबी कमी होण्यासोबतच चेहऱ्याची आणि मानेची चरबीही कमी होते.
तुम्ही चक्रासनही करू शकता, चक्रासन तुमच्या पायापासून संपूर्ण शरीरातील चरबी कमी करते.