दा जून महिन्यापूर्वीच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असल्याने शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसात भिज...
अनेकदा पावसाळ्यात छत्री ओली असल्यानं ती बाहेर कुठेही कोपऱ्यात ठेवली जाते. त्यामुळे बऱ्याचदा गडबडीत अनेकजण छत्री परत तिथून घ्यायला विसरतात. तेव्हा पावसाळ्यात छत्री विकत घेताना त्या सोबत त्याचे प्लास्टिक कव्हर सुद्धा विकत घ्या. अथवा बॅगमध्ये ओली छत्री ठेवण्यासाठी एक प्लास्टिक पिशवी कॅरी करा. असं केल्यास तुम्ही ओली छत्री तुमच्या बॅगेत ठेऊ शकाल आणि ती तुम्ही इतरत्र विसरणार नाही.
बाजारात बॅगेला छत्री अडकवण्यासाठी एक हुक मिळतो. छत्री हातात किंवा इतरत्र ठेवली तर ती हरवते. तेव्हा अशा प्रकारच्या हुकचा वापर केल्यास तुम्ही बॅगेला छत्री अडकवू शकता.
पावसाळ्यात छत्री विकत घेत असताना फक्त त्याच्या डिझाईनवर नाही तर आकारावर देखील लक्ष द्या. ऑफिसला किंवा कामानिमित्त सतत घराबाहेर राहत असाल तर बॅगेत मावेल अशा आकाराची छत्री खरेदी करा. ज्यामुळे छत्री इतरत्र ठेवली जाणार नाही आणि मग छत्री हरवण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.
बऱ्याचदा लोकं घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरतात. ज्यामुळे बाहेर पाऊस पडल्यास त्यांची पंचाईत होते. अशावेळी छत्रीसाठी एखादा स्टॅन्ड घेऊन तो स्टॅन्ड घराच्या दरवाजाजवळ ठेवावा. जेणेकरून घरातून बाहेर पडताना छत्री घेऊन जाण तुम्हाला लक्षात राहील.
पावसाळ्यात छत्री न विसरण्याची अजून एक भन्नाट ट्रिक म्हणजे तुम्ही महागडी छत्री विकत घ्या. असं केल्याने तुम्ही महाग छत्रीबाबत अधिक सतर्क राहता त्यामुळे छत्री हरवण्याचं प्रमाण कमी होतं.
छत्री तुम्ही शूजच्या अथवा चपलेच्या वेलक्रोला बांधून ठेऊ शकता. जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही घेऊन जायला छत्री विसरणार नाही.
अनेकदा आपण घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरतो अथवा ट्रेन, बस, ऑफिस अशा ठिकाणी छत्री विसरून येतो. ज्यामुळे आपले नुकसान होते आणि बऱ्याचदा पावसात भिजण्याची वेळ येते. तेव्हा छत्री विसरू नये म्हणून तुम्ही वरील दिलेल्या ट्रिक वापरू शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)