IRCTC द्वारे संपूर्ण कोच किंवा ट्रेन बुक करण्यासाठी किमान 30 दिवस आधी एफटीआर पोर्टल किंवा स्टेशन बुकिंग काउंटरच्या माध्यमातून विनंती करा.
भारतात ट्रेनचं कंफर्म तिकिट बूक करणं अनेकदा आव्हानात्मक असतं. त्यातही खासकरुन जर ग्रुपमध्ये प्रवास करणार असून तर हे अजूनच आव्हानात्मक ठरतं. एकत्र सीट बुक करणे अवघड वाटू शकते, परंतु भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) यावर उपाय दिला आहे, तो म्हणजे संपूर्ण ट्रेन किंवा कोच भाड्याने घेणे.
तुम्ही एकत्रितपणे आरामशीर प्रवास करण्याची योजना आखणार असाल तर IRCTC च्या फीस टॅरिफ रेटच्या (FTR) माध्यमातून ते बुकिंग करु शकता. जाणून घ्या नेमकी प्रक्रिया कशी असले.
1) FTR पर्याय समजून घ्या IRCTC तीन प्रकारचे चार्टर ऑफर करते:
रेल्वे कोच चार्टर - एक पूर्ण कोच बुक करा (18 तो 100 जागा)
ट्रेन चार्टर - संपूर्ण ट्रेन आरक्षित करा (18 ते 24कोच)
सलून चार्टर - आलिशान खाजगी सलूनसह राहण्याची सुविधा
बुकिंग 6 महिने आधीच सुरू होते आणि 30 दिवस आधी बंद होते मल्टी-कोच/ट्रेनसाठी: किमान 18 कोच, जास्तीत जास्त 24 (2 SLR/जनरेटर कार समाविष्ट असणे आवश्यक आहे)
आयआरसीटीसी एफटीआर पोर्टल (https://www.ftr.irctc.co.in) द्वारे ऑनलाइन:
तुमचे खाते रजिस्टर करा, ओटीपी व्हेरिफाय करा, सेवा निवडा (कोच, ट्रेन किंवा सलून)
मूळ/गंतव्यस्थान, तारीख, ट्रेन, क्रमांक/कोचचा प्रकार प्रवाशांची यादी अपलोड करा आणि पैसे जमा करा
ट्रेन ज्या स्टेशनवरून निघते किंवा ज्या स्टेशनवर 10 मिनिटांचा थांबा आहे त्या स्टेशनवर मुख्य आरक्षण अधिकारी किंवा स्टेशन मॅनेजरशी संपर्क साधा.
फॉर्म भरा, सर्व प्रवाशांच्या प्रवास आणि ओळखीची माहिती द्या. तसंच डिपॉझिट आणि तिकिटाचे पैसे भरा. लग्न, कॉर्पोरेट ट्रिप, तीर्थयात्रा इत्यादींसाठी योग्य.