PHOTOS

Bollywood Actress Real Names: रेखा ते कतरिना... 'या' सुपरस्टार अभिनेत्रींची खरी नावं तुम्हाला माहितीयेत का?

Bollywood Actress Real Names: बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. मात्र, या अभिनेत्रींची खरी नावं वेगळीच आहेत, हे फार थोड्यां लोकांनाच माहीत असतं. काहींनी लोकप्रियतेसाठी, काहींनी ज्योतिषाच्या सल्ल्याने तर काहींनी नावात गोंधळ होऊ नये यासाठी आपली नावं बदलली आहेत. पाहूयात अशाच काही अभिनेत्रींच्या खऱ्या नावांचा खुलासा.

Advertisement
1/9
रेखा
रेखा

बॉलिवूडवर अनेक दशकं अधिराज्य गाजवलेल्या रेखा यांचं मूळ नाव भानुरेखा गणेशन आहे. बालवयातच त्यांनी आपलं नाव 'रेखा' असं ठेवून घेतलं आणि त्यानंतर त्या याच नावाने प्रसिद्ध झाल्या.

 

2/9
कियारा अडवाणी
कियारा अडवाणी

कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया अडवाणी आहे. परंतु आलिया भट्टचे हे नाव आधीच प्रसिद्ध असल्याने तिने दोघींच्या नावांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून आपलं नाव कियारा ठेवलं.

 

3/9
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचं मूळ नाव अश्विनी शेट्टी आहे. मॉडेलिंग करियरच्या सुरुवातीलाच एका ज्योतिषाच्या सल्ल्याने तिने आपलं नाव बदलून शिल्पा असं ठेवलं.

4/9
कतरिना कैफ
कतरिना कैफ

कतरिनाचं खऱ्या आयुष्यातील नाव कतरिना टर्कोटे आहे. जे तिच्या आईचे अडनाव आहे. बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना तिने वडिलांचं आडनाव घेऊन  'कैफ' हे आडनाव लावलं.

5/9
तब्बू
तब्बू

तब्बू हिचं खरे नाव तबस्सुम हाश्मी खान आहे. हे नाव मोठं असल्याने तिने ते संक्षिप्त करत 'तब्बू' हे नाव स्वीकारलं आणि याच नावाने ती ओळखली जाऊ लागली.

6/9
श्रीदेवी
श्रीदेवी

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा यंगर अय्यप्पन होतं. त्यांनी देखील चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी आपले नाव बदलले.

 

7/9
प्रीती झिंटा
प्रीती झिंटा

'सोल्जर' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान प्रीती झिंटाने आपलं नाव बदलले. तिचं मूळ नाव प्रीतम सिंग झिंटा होतं.

 

8/9
मल्लिका शेरावत
मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना तिने मल्लिका शेरावत हे नाव लावलं आणि याच नावाने ती प्रसिद्ध झाली.

9/9

या अभिनेत्रींच्या यशामागे केवळ अभिनयच नाही तर त्यांच्या नावामागील विचारसुद्धा लपलेला आहे. हे बदल त्यांच्या ओळखीचा भाग बनले आहेत आणि त्यांना एक वेगळीच छाप निर्माण करण्यात मदत झाली आहे.





Read More