PHOTOS

टॅरिफ दर लावणारे डोनाल्ड ट्रम्प किती श्रीमंत आहेत, दरवर्षी त्यांना किती पगार मिळतो?

Donald Trump Salary vs PM Modi Salary: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ दर लादण्यात आले आहे. टॅरिफ दरांचा फटका शेअर बाजारावर होताना दिसतोय. 

 

Advertisement
1/8

जगभरात दबदबा असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाइट हाउसकडून किती वर्षाला किती पगार मिळतो, हे तुम्हाला माहितीये का? ट्रम्प यांना पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षाही जास्त सॅलरी मिळते. 

2/8

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून वर्षाला 4,00,000 डॉलर इतका पगार मिळतो. भारतीय रुपयांनुसार हा आकडा 35,024,420 रुपये इतका आहे. फक्त इतकेच नव्हे तर राष्ट्रपती पदामुळं त्यांना अनेक प्रकारच्या सुविधादेखील मिळतात. 

3/8

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 50,000 डॉलर म्हणजेच  43,78,052 रुपये पर्सनल आणि ऑफिशियल ड्युटी म्हणून दिले जातात. 

4/8

अधिकृत दौऱ्यासाठी 1 लाख डॉलर नॉन टॅक्सेबल भत्तादेखील देण्यात येतो. वेगवेगळ्या ठिकाणी भाषण देण्यासाठी 19,000 डॉलर देण्यात येतात. त्या व्यतिरिक्त, व्हाइट हाउस मेंटेन करण्यासाठी 1 लाख डॉलर दिले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांना विविध खर्चांसाठी 5,69,000 डॉलर देण्यात येतात. 

5/8
कुठे करतात गुंतवणुक
कुठे करतात गुंतवणुक

डोनाल्ड ट्रम्प शेअर्स आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणुक करतात. एका मीडिया रिपोर्टनुसार, क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीमुळं ट्रम्प यांची नेटवर्थ 10 मिलियन डॉलर या त्यापेक्षा अधिक असू शकते. तसंच, ते रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करतात. 

 

6/8
पंतप्रधान मोदींचा पगार किती?
पंतप्रधान मोदींचा पगार किती?

पंतप्रधान मोदी यांच्याकडे अनेक अधिकार आहेत. पंतप्रधान मोदी यांना दर महिना 1.66 लाख रुपये पगार मिळतो. 

7/8

यात 45,000 रुपये खासदार भत्ता, 3,000 रुपये खर्च भत्ता, 2,000 रुपये दैनिक भत्ता आणि 50,00० रुपये मूळ वेतन समाविष्ट आहे. जर या इतर गोष्टी काढून टाकल्या तर पंतप्रधान मोदींना 50 हजार रुपये मिळतील.

8/8

दरम्यान, टॅरिफ रेटचे थेट परिणाम भारतातील चर्मउद्योग क्षेत्र, रसायन निर्मिती क्षेत्र, पादत्राणांचा व्यवसाय, खेळ, दागदारिने, कापडउद्योग, कोळंबीची शेती (मत्स्यशेती) या क्षेत्रांवर होताना दिसतील.





Read More