जाणाऱ्या एअर इंडिया विमानाला अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. यात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला तर एकूण मृतांचा आकडा हा 265 एवढा आहे. ...
एअर इंडियाची अहमदाबाद लंडन विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 239 प्रवासीसह 12 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. हे एअर इंडियाचं विमान अहमदाबादमधील एका वसतिगृहावर कोसळलं. या अपघातात एकूण 265 जणांचा नाहक बळी गेला आहे. या अपघातात अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शिवाय सुन्न करणारी गोष्ट म्हणजे या अपघातात लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे.
या अपघातात महाराष्ट्रातील डोंबिवलीमधील रोशनी सोनघरे हिचा समावेश आहे. रोशनी ही एअर इंडियच्या विमानातील केबिन क्रूमध्ये होती. रोशनी ही इंस्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर देखील होती.
रोशनीचे इंस्टाग्रामवर 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स असून ती एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर होती. तिने एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूनही काम केले होते. तिचा अपघाती मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली.
रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती. रोशनीचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते. मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं.
रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये कामावर आहे. तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले असून ती 27 वर्षांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे आणि त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.
रोशनीला लहानपणापासूनच एअर होस्टेस बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली आणि अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र, याच विमानाचा अपघातात रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अवघ्या चार दिवसांपूर्वी ती गावी आली होती. कुलदेवतेचं दर्शन घेतलं, नातेवाईकांना भेटली. नंतर अहमदाबाद येथे गेली होती. यानंतर ती परत कधी गावी येणार नाही असं कधीही आम्हाला वाटलं नव्हतं, असं तिच्या काकांनी सांगितलं होतं.
रोशनीच्या लग्नाचे बोलणी झाली होती, असं तिच्या काकांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, दोन-चार महिन्यापूर्वीच आम्ही इथे येऊन गेलो होतो. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तिची एंगेजमेंट होणार होती आणि मार्चमध्ये तिचं लग्न होणार होतं. सगळे बोलणे झाली होती आम्ही हॉल पण आम्ही शोधत होतो. मात्र याच दरम्यान ही घटना घडली.