Cholesterol Health Tips: पाणी आणि कोलेस्ट्रॉल याचा संबंध आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना वारंवार पडतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही आरोग्य तज्ज्ञांना विचारलं.
खराब जीवनशैलीमुळे धमन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागतं. त्यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या निर्माण होतात.
खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवायचं असेल तर त्याला कोलेस्टेरॉलपासून दूर राहणं गरजेच आहे.
आपल्या प्रत्येकाच्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक चांगला कोलेस्ट्रॉल आणि दुसरा वाईट कोलेस्ट्रॉल. वाईट कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहिलं नाही तर आरोग्यासंबंधात अनेक समस्या निर्माण होतात.
वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैली बदलण्याची गरज आहे. त्याशिवाय खाण्याच्या सवयी आणि आहाराचे योग्य पालन करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
आपले शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले असल्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दिवसभर पाणी प्यायला हवं. अनेक संशोधनांतून हे सिद्ध झालंय की कमी पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलवरही मोठा परिणाम होतो.
पाणी प्यायल्याने शिरांमध्ये साचलेली घाण निघून जाण्यास मदत मिळते. त्याच वेळी, जर तुम्ही कमी पाणी प्यायल्यात, तर रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली घाण ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढतं.
निर्जलीकरणामुळे यकृत रक्तात अधिक कोलेस्टेरॉल बनवतं. जास्त पाणी प्यायल्यास उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याशिवाय रुग्णांनी फायबर आणि प्रोटीनयुक्त आहाराच सेवन करावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)