झी मराठी वरील 'अग्गंबाई सासूबाई' मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस असा प्रतिसाद मिळत आहे.
आसावरी, अभिजीत, शुभ्रा आणि बबड्या या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडीच्या ठरल्या आहेत.
नवरात्री नंतर आता दसरा आणि दिवाळीचे वेध लागतात. अग्गबाई सासूबाई मालिकेच्या सेटवर दसरा साजरा करण्यात आला.
अग्गबाई सासूबाई मालिकेत दसऱ्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.
दसरा निमित्त हा विशेष भाग प्रेक्षकांना झी मराठीवर 24 ऑक्टोबरला पाहता येणार आहे.