PHOTOS

पृथ्वीवरून मानवी अस्तित्वं नाहीसं झालं तर?

Earth Without Humans: पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, जो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध करत आहे. कारण ठरतेय ती म्हणजे या पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी. 

Advertisement
1/7
अस्तित्व
अस्तित्व

पृथ्वीवर फक्त जीवसृष्टीचं अस्तित्वंच नव्हे, तर त्याचा इतका विकास झाला आहे की याच पृथ्वीवरील मानवी अस्तित्वं अर्थात मनुष्याकडून परग्रहावरील जीवसृष्टीसंदर्भातील शोध घेतला जात आहे.  पृथ्वीवरील हेच मानवी अस्तित्वं नाहीसं झालं तर? 

2/7
पूर
पूर

संपूर्ण जगाची लोकसंख्या सध्याच्या घडीला 8.2 अब्ज इतकी आहे. पण, एके दिवशी जर सर्वच मानवी अस्तित्वं नष्ठ झालं तर? सर्वात पहिला परिणाम पायाभूत सुविधांवर होणार आहे. पॉप्युलर सायन्सच्या एका अहवालानुसार पाणी आणि वीजपुरवठा खंडीत होईल. भूपृष्ठाखालून धावणाऱ्या मोनो आणि प्रवासाच्या निमित्तानं तयार करण्यात आलेल्या भुयारांमध्ये पूर येईल. 

 

3/7
आर्द्रता
आर्द्रता

ज्या भागांमध्ये आर्द्रता आहे तिथं भिंतींवर शेवाळ धरेल, कोसळलेले वृक्ष वादळांमध्ये घरांचं नुकसान करतील. मोठाल्या इमारती कोसळतील, लाकडाचं संपूर्ण बांधकाम नष्ट होईल. 

 

4/7
सर्वकाही नष्ट होईल
सर्वकाही नष्ट होईल

मानवानं पृथ्वीवर जी शहरं वसवली आहेत, ते सर्वकाही नष्ट होईल. इमारती, रस्ते आणि तळघरं नाहीशी होतील. या साऱ्यामागे पूर हे एकमेव कारण असेल. जीवसृष्टीतून मनुष्य घटक नष्ट झाल्यास पृथ्वीवर फक्त कांस्य आणि धातूच्या मूर्ती, मातीची भांडी आणि सोन्याची नाणीच अस्तित्वात राहून कालांतरानं तेही भूगर्भात लुप्त होतील. 

 

5/7
अणू प्रकल्प
अणू प्रकल्प

पृथ्वीवर सध्याच्या घडीला साधारण 440 सक्रिय अणू प्रकल्प असून मानवी हस्तक्षेपाशिवाय हे प्रकल्प वितळण्यास सुरुवात होईल. इथं कुलिंग सिस्टीममध्ये असणारं पाणी बाष्पीभवनानं नाहीसं होईल. उष्णतेनं अणूउर्जेचे स्फोट होतील. 

 

6/7
अन्नसाखळी
अन्नसाखळी

मानवी जीवन नष्ट होण्यासमवेत कैक जीव आणि अन्नसाखळीसुद्धा नष्ट होईल. गाय, श्वान फार काळ टीकू शकणार नाहीत. मानवी उत्सर्जनाअभावी पृथ्वीची तापमान वाढ काही अंशानं थांबेल, कारखान्यांमधील धातू वितळेल. 

 

7/7
जीवसृष्टी
जीवसृष्टी

पृथ्वीवरून मानवी अस्तित्वं नष्ट झालं तरीही, तिचं अस्तित्वं मात्र कायम असेल. मुळात पृथ्वीला मानवाची काहीच गरज नाही. पृथ्वीवर तिथवर जीवसृष्टी कायम असेल जोपर्यंत सूर्याची उष्णता सहन करण्याची क्षमता या ग्रहामध्ये आणि ग्रहावरील जीवसृष्टींमध्ये असेल. 

 





Read More