गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. या दिवशी घराघरांत गुढी उभारली जाते. पाडवा प्रत्येक घरात साजरा केला जातो. दारावर तोरण आणि दारासमोर रांगोळी काढली जाते. आज आम्ही तुम्हाला रांगोळीच्या काही हटके डिझाइन आणणार आहोत. जाणून घेऊया.
दारी तोरण आणि घरासमोर सुरेख रांगोळी हे प्रत्येक घरात गुढीपाडव्याच्या दिवशी चित्र असते. आज आम्ही तुम्हाला रांगोळीच्या काही हटके डिझाइन सांगणार आहोत.
घरात असलेल्या टिकाऊ वस्तूंदेखील तुम्ही रांगोळीसाठी वापरू शकता. बांगड्यांचा वापर करुनही तुम्ही छान वर्तुळ आणि त्यामध्ये गुढी काढू शकता.
या रांगोळीची डिझाइन शेजाऱ्यांचे व नातेवाईकांचे लक्ष वेधून घेईल. तसंच, तुमचं चारचौघात कौतुकदेखील होईल.
गुढीसोबतच बत्ताशेच्या गाठी असलेली रांगोळी काढू शकता. ही डिझाइन पाहून अनेकांचे लक्ष वेधून घेईल
गुढी आणि थोडीशी फुलं काढून तुम्ही दारासमोर ही सुबक रांगोळी काढू शकाल.
तीन ते चार रंग वापरून तुम्ही ही सोप्पी रांगोळी काढू शकता.
अत्यंत रेखीव आणि सुबक ही रांगोळी काढायलादेखील सोप्पी आहे.