PHOTOS

ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्समुळे चेहरा दिसतोय विद्रूप? वापरा 'या' घरगुती टिप्स!

ackheads: ब्लॅकहेड्स चेहऱ्यावरील एक सामान्य समस्या आहे, विशेष म्हणजे नाक, तोंड आणि हनुवटीवर. यामुळे त्वचेचा रंग मळकट दिसतो आणि बरेच लोक...

Advertisement
1/7

धुळीमुळे आपल्या चेहऱ्यावर अनेकदा ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दिसू लागतात. हे व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स सर्वाधिक नाक आणि हनुवटीवर येतात. त्वचेवरील छिद्र उघडल्यावर त्यात धुळ आणि तेल जमा होऊन ही समस्या उद्भवू लागते. पाहूयात, घरच्या घरी तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कसे काढू शकता.

2/7
1. लिंबू आणि मध
1. लिंबू आणि मध

लिंबू आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे या समस्येवर प्रभावीपणे काम करतात. एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा आणि ते चेहऱ्यावर लावा. काही मिनिटे ठेवून स्वच्छ पाण्याने धुवा.

3/7
2. टि ट्री ऑईल
2. टि ट्री ऑईल

टि ट्री ऑईलमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे मुरूम आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करतात. या तेलाचे 2-3 थेंब एक कपासावर घालून प्रभावित भागावर हलक्या हाताने मसाज करा.

4/7
3. हळद आणि बेसन
3. हळद आणि बेसन

नाकावर आणि हनुवटीवर बेसन आणि हळदीचे स्क्रब लावल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघून जातात आणि चेहऱ्यावर चमक येते. एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि कच्च्या दूधात एकत्र करून हे पेस्ट तयार करा आणि ते प्रभावित भागावर लावा. 

5/7
4. बेकींग सोडा
4. बेकींग सोडा

बेकींग सोड्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जिथे ब्लॅकहेड्स आहेत त्या भागावर लावून हलक्या हाताने घासून घ्या. हे नियमितपणे केल्यास ब्लॅकहेड्स कमी होतात.या सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स सहजपणे काढू शकता.

6/7
5. स्टीमिंग (वाफ घेणे)
5.  स्टीमिंग (वाफ घेणे)

चेहऱ्यावरून मुरूम आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे स्टीमिंग. एका भांड्यात गरम पाणी घ्यावे आणि त्या पाण्याची वाफ चेहऱ्यावर 5-10 मिनिटे घेतल्याने त्वचेचे छिद्र उघडतात आणि ब्लॅकहेड्स काढणे सोपे होते. नंतर त्वचेवरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी स्वच्छ ब्लॅकहेड एक्सट्रॅक्टरने हलके दाबून काढावे.

7/7

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Read More