शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. हा आजार प्राणघात ठरु शकतो. अशावेळी आपण काय खातो किंवा जेवतो याची जास्त काळजी घ्यावी लागते. जसे की, शरिरात उच्च कोलोस्ट्रॉल असेल तर अशावेळी अंडी खावे की नाही? काय सांगतात तज्ज्ञ पाहा...
अंडी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते. कारण त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. बरेच लोक नाश्त्यातही अंडी खातात. एका अंड्यामध्ये अंदाजे 78 कॅलरीज असतात. अंड्यांमध्ये प्रथिने, निरोगी चरबी, पोटॅशियम, सोडियम, कार्बोहायड्रेट्स आणि तत्सम घटक असतात.
तर अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी12, सेलेनियम इत्यादी पौष्टिक घटक असतात. अंड्यामध्ये सुमारे 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे अनेकांचा असा विश्वास आहे की यामुळे हृदयविकार होऊ शकतो आणि शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
आपल्या शरीरात आढळणाऱ्या कोलेस्टेरॉलला रक्तातील कोलेस्टेरॉल म्हणतात. आपल्याला अन्नातून जे कॉलेस्टेरॉल मिळते त्याला डायट्री कोलेस्टेरॉल म्हणतात. ब्लड कॉलेस्टेरॉलला चांगले कॉलेस्ट्रॉल किंवा एचडीएल असेही म्हणतात.
शरीरात वाईट कोलेस्टेरॉल देखील असते, जे यकृताद्वारे तयार होते आणि मेणासारखे चरबीयुक्त पदार्थ आहे. परंतु जेव्हा शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे हृदयात रक्तप्रवाहात समस्या निर्माण होतात. यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, उच्च कोलेस्ट्रॉल असलेले लोक अंडी खाऊ शकतात. परंतु अशा लोकांनी अंडयाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. अंड्यांमध्ये आहारातील कोलेस्टेरॉल असते. आहारातील कोलेस्टेरॉल - मांस, सीफूड, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते.
जर तुम्ही अंडी खात असाल तर तुम्हाला HDL आणि LDL च्या पातळीत थोडा फरक दिसू शकतो. तुमचे शरीर स्वतःच कोलेस्टेरॉल तयार करते असा तज्ञांचा विश्वास आहे. त्यामुळे आहारातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अंड्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
अंड्यांवर भर देण्याऐवजी सकस खाण्यावर भर द्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा.
बरेच लोक 1 ते 2 अंडी खाऊ शकतात. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर ज्यूस आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. याशिवाय धान्यांचा आहारात समावेश करा. जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सचे सेवन कमी करा. जर तुमचे कोलेस्टेरॉल जास्त असेल तर तुम्ही आठवड्यातून फक्त 4 ते 5 अंडी खा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)