PHOTOS

Tesla:मुंबईत सेंटर सुरु करणारी टेस्ला कार भारतीयांना परवडेल का? किंमत, मायलेज अन्...A टू Z माहिती!

टेस्लाचे शोरूम मुंबईच्या BKC म्हणजेच बॉम्बे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उघडला आहे. भारतात टेस्लाच्या कारची किंमत काय आहे? यात इतकं खास काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. 

Advertisement
1/9
Tesla:मुंबईत सेंटर सुरु करणारी टेस्ला कार भारतीयांना परवडेल का? किंमत, मायलेज अन्...A टू Z माहिती!
Tesla:मुंबईत सेंटर सुरु करणारी टेस्ला कार भारतीयांना परवडेल का? किंमत, मायलेज अन्...A टू Z माहिती!

Tesla car: भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे ऑटोमोबाईल बाजार असून देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) विक्रीचा वेग झपाट्याने वाढतोय. जूनमध्ये इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री 13178 युनिट्स होती. ऑटोमोबाईल बाजारात प्रवासी वाहनांच्या EVs चा वाटा 4.4% पर्यंत वाढलाय.

2/9
EV कंपनी टेस्ला भारतात दाखल
 EV कंपनी टेस्ला भारतात दाखल

 एलोन मस्क यांची बहुचर्चित EV कंपनी टेस्ला भारतात दाखल झाली. टेस्लाचा शोरूम मुंबईच्या BKC म्हणजेच बॉम्बे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उघडला आहे. भारतात टेस्लाच्या कारची किंमत काय आहे? यात इतकं खास काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. 

3/9
6 युनिट्सचा समावेश
 6 युनिट्सचा समावेश

गेल्या काही महिन्यांत टेस्लाने भारतात 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची इलेक्ट्रिक वाहने, चार्जर आणि अॅक्सेसरीज आयात केल्या आहेत. हे सर्व चीन आणि अमेरिकेतून आयात केले गेले आहे. यामध्ये कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल वाय कारच्या 6 युनिट्सचा समावेश आहे.

4/9
कोणाशी स्पर्धा?
कोणाशी स्पर्धा?

लोकांना टेस्ला ब्रँड कसा आवडतो आणि त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना मागणी आहे का? याकडे कंपनीचे लक्ष आहे. अमेरिका आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण असताना टेस्ला भारतात येत आहे. हे दोन्ही टेस्लाचे सर्वात मोठे बाजार आहेत. गेल्या तिमाहीत टेस्लाच्या विक्रीत घट झाली. 2024 नंतर विक्रीत आणखी घट होऊ नये अशी टेस्लाची इच्छा आहे. 2025 च्या पहिल्या तिमाहीत टेस्लाचे एकूण नफा 16.3% पर्यंत घसरला, जो गेल्या वर्षी याच काळात 17.4% होता.

5/9
जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार
जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार

मॉडेल वाय ही जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे, परंतु बहुतेक भारतीय खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर राहण्याची अपेक्षा आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा अजूनही 5% पेक्षा कमी आहे आणि लक्झरी वाहनांचा वाटा देशातील एकूण वाहन विक्रीत फक्त १% आहे. भारतातील टेस्लाचे मुख्य स्पर्धक बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी सारख्या मोठ्या कंपन्या असतील. टेस्ला टाटा मोटर्स, महिंद्रा किंवा एमजी मोटर सारख्या कमी किमतीच्या कंपन्यांशी स्पर्धा करेल अशी अपेक्षा नाही.

6/9
एकाच वेळी 27 शहरांमध्ये डीलरशिप
एकाच वेळी 27 शहरांमध्ये डीलरशिप

 

व्हिएतनामी ईव्ही कंपनी विनफास्ट 15 जुलैपासून भारतात आपले शोरूम उघडणार आहे. कंपनी भारतातील 27 शहरांमध्ये एकाच वेळी ३२ डीलरशिप उघडणार आहे. यामध्ये दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, पुणे, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता, कोचीन, भुवनेश्वर, तिरुवनंतपुरम, चंदीगड, लखनौ, कोइम्बतूर, सुरत, कालिकत, विशाखापट्टणम, विजयवाडा, शिमला, आग्रा, झाशी, ग्वाल्हेर, वापी, बडोदा आणि गोवा यांचा समावेश आहे. त्यानंतर कंपनी एका वर्षात त्यांची संख्या 35 डीलरशिपपर्यंत वाढवेल. विनफास्टची भारतातील पहिली कार VF6 आणि VF7 असणार आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक कार अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांसह येतात.

7/9
...तर मग मॉडेल-वाय कारची किंमत किती असेल?
...तर मग मॉडेल-वाय कारची किंमत किती असेल?

टेस्लाची मॉडेल-वाय कार ही एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक क्रॉसओवर एसयूव्ही आहे. ती केवळ दिसायलाच सुंदर नाही तर तिची वैशिष्ट्ये देखील आश्चर्यकारक आहेत. अहवालात असे सांगितले जात होते की या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 27 लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे, जरी ही किंमत आयात शुल्काशिवाय आहे. या कारवरील आयात शुल्क आणि कर समाविष्ट करून सुमारे 21 लाख रुपये सरकारला द्यावे लागतील. म्हणजेच, ग्राहकांना मॉडेल वाय कारसाठी सुमारे 48 लाख रुपये द्यावे लागू शकतात. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर भारतासाठी अपडेट केलेल्या किमतींनुसार किमती सुमारे 60 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतात.

8/9
रियर-व्हील ड्राइव्हची किंमत
 रियर-व्हील ड्राइव्हची किंमत

या मॉडेलच्या रियर-व्हील ड्राइव्हची किंमत सुमारे 59.89 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ज्याची ऑन-रोड किंमत 61.7 लाख रुपये असणार आहे. त्याच मॉडेलमध्ये लाल व्हेरिएंटमध्ये लांब पल्ल्याच्या रियर-व्हील ड्राइव्हची किंमत सुमारे 68.14 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ज्याची ऑन-रोड किंमत 71.2 लाख रुपये असणार आहे.

9/9
टेस्लाची कार खूप महाग का असेल?
टेस्लाची कार खूप महाग का असेल?

टेस्लाचे हे मॉडेल (मॉडेल-वाय) देशात विक्रीसाठी उपलब्ध असेल.  जास्त आयात शुल्कामुळे या कारची किंमत अमेरिका किंवा चीनमधील वास्तविक किंमतीपेक्षा खूपच जास्त असेल. देशात इलेक्ट्रिक कार आयात केल्यामुळे, कंपनीला सुमारे 70 टक्के आयात शुल्क आणि इतर कर भरावे लागतील. एलोन मस्कने देशात आयात केलेल्या वाहनांवर असलेल्या मोठ्या करावरही नाराजी व्यक्त केली होती.





Read More