मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलीग सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहे. सारा आपल्या ग्लॅमर आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आता सारा तेंडुलकरप्रमाणेच आणखी एका क्रिकेटपटूच्या मुलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते असलेले नवज्योत सिंह सिद्धू क्रिकेट मैदानापासून राजकारणाच्या खेळपट्टीपर्यंत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता नवज्योत सिद्धू यांच्या मुलीच्या ग्लॅमरस फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नवज्योत सिद्धू यांच्या मुलीचं नवा राबिया सिद्धू असं असून इन्स्टाग्रामवर आपले ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.
राबिया सिद्धू आपल्या आई-वडिलांप्रमाणे राजकारणात सक्रिय नाही. पण प्रचारात मात्र ती पुढे असते. गेल्या वर्षी वडिल नवज्योत सिद्धू यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राबिया दिसली होती. आपले वडिल जोपर्यंत जिंकणार नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही असं राबियाने म्हटलं होतं.
राबिया इन्स्टाग्रामवर चांगलीय सक्रिय असते. आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो ती इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. राबियाचे इन्स्टावर 70.3k फॉलोअर्स आहेत. राबिया एक फॅशन आयकॉन आहे आणि ड्रेसिंग सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते.
राबियाने आपलं शालेय शिक्षण पंजाबमधल्य पटियाला इथून पूर्ण केलं आहे. त्यानंतर तीने सिंगापूर आणि लंडनमध्ये फॅशन डिझाईनिंगचा कोर्स पूर्ण केला. राबिया स्वत: एक फॅशन डिझायनर आहे आणि फॅशन इंडस्ट्रीतच तिला करिअर करायचं आहे.
राबिया आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे.
सोशल मीडियावर तीने शेअर केलेल्या बिकिनी फोटोंमुळे चांगलीच हवा झाली होती. राबिया पार्टीलव्हर असल्याचंही तिच्या फोटोंमुळे दिसतं. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर ती नेहमी मोठमोठ्या पार्टीजध्ये दिसते.
राबिया सिद्धू 'द कपिल शर्मा शो' मध्ये सुद्धा दिसली होती. या कार्यक्रमात तीने आपल्या आई-वडिलांशी जोडले गेलेले अनेक मजेदार किस्से शेअर केले होते. कार्यक्रमात तिचे आई-वडिलही होते.