PHOTOS

मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय! पहिल्यांदा घर घेणाऱ्यांचं 20% Advance Payment चं टेन्शन संपणार; आता 90% रक्कम...

Big Decision Home Buyers: पहिल्यांदाच घर घेण्यासंदर्भात तुम्ही विचार करत असाल तर केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय तुमच्या पथ्थ्यावर पडू शकतो असाच आहे. नेमका काय आहे हा नियम आणि कसा फायदा होणार जाणून घ्या...

Advertisement
1/9

मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नवं घर घेण्याचं 20 टक्के रक्कम अगोदर देण्याचं टेन्शन कमी होणार आहे. नेमका हा निर्णय काय आहे पाहूयात...

2/9

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

 

3/9

विशेष म्हणजे या नव्या नियम बदलांचा पगारदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. खास करुन स्वतःचे घर घ्यायचे ज्यांचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. (फोटो प्रातिनिधिक - सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)

 

4/9

नव्या नियमांनुसार, कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून 90 टक्के इतकी रक्कम घर खरेदी करण्यासाठी काढू शकतात. (फोटो प्रातिनिधिक - सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)

 

5/9

काय आहे नवा नियम? नवीन नियमांनुसार कर्मचारी आता त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी, घर बांधण्यासाठी किंवा गृहकर्जाचा ईएमआय भरण्यासाठी ईपीएफओ सदस्य आपल्या खात्यातून 90 टक्के रक्कम काढू शकतील. (फोटो प्रातिनिधिक - सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)

 

6/9

अशाप्रकारे पैसे काढण्यासाठी आधी पाच वर्षांपर्यंतची सेवा आवश्यक होती. मात्र आता तीन वर्षांच्या सेवेनंतर हा लाभ घेता येईल. हा निर्णय सुद्धा कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का मानला जात आहे. (फोटो प्रातिनिधिक - सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)

 

7/9

या सुविधेचा लाभ केवळ एकदाच घेता येईल. हा बदल ईपीएफ योजनेच्या 1952 च्या परिच्छेद 68- बीडीअंतर्गत केलेला आहे. (फोटो प्रातिनिधिक - सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)

 

8/9

पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाते. कर्मचाऱ्याचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा 12 टक्के जमा केला जातो. (फोटो प्रातिनिधिक - सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)

 

9/9

कर्मचाऱ्याच्या पीएफच्या खात्यात जेवढी रक्कम पगारातून कापून जाते तेवढाच पैसा कंपनी जमा करते. सध्या ईपीएफवर प्रति वर्ष 8.25 टक्के व्याज आहे. (फोटो प्रातिनिधिक - सौजन्य फ्रीपिकवरुन साभार)





Read More