भारतात सर्व नोकरदार वर्गाकडे पीएफ अकाऊंट असते. ज्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवले जाते. कर्मचाऱ्यांचा पीएफ अकाऊंट हे एक प्रकारचे सेव्हिंग अकाऊंटप्रमाणे काम करते.
EPFO rules: भारतात सर्व नोकरदार वर्गाकडे पीएफ अकाऊंट असते. ज्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवले जाते. कर्मचाऱ्यांचा पीएफ अकाऊंट हे एक प्रकारचे सेव्हिंग अकाऊंटप्रमाणे काम करते.
यात प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचा 12 टक्के भाग जमा केला जातो. एवढीच रक्कम कंपनीदेखील कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करते.
कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेचा काही भाग त्याच्या पेन्शनसाठीही राखून ठेवला जातो. ईपीएफओच्या नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी 10 वर्षांहून अधिक काळ पीएफमध्ये योगदान देत राहिला तर त्याला पेन्शन मिळण्याचा हक्क असतो.
काही परिस्थितींमध्ये तुम्ही पीएफ खात्यात जमा केलेली रक्कमही काढू शकता. पण जर तुम्ही पीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढले तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. म्हातारपणी पश्चाताप करण्यापेक्षा आताच पेन्शनबाबत EPFO चा नियम तपशीलवार समजून घेऊया.
कर्मचारी आणि कंपनी दोघेही पीएफ खात्यात योगदान देतात. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12% पीएफ खात्यात जातात आणि कंपनी देखील कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात 12% योगदान देते. कंपनीच्या 12% योगदानापैकी 8.33% थेट EPS फंड (कर्मचारी पेन्शन योजना निधी) मध्ये जातो. आणि उर्वरित 3.67% पीएफ खात्यात जातो.
जर कोणत्याही पीएफ खातेधारकाने 10 वर्षांसाठी पीएफ खात्यात योगदान दिले तर तो पेन्शनचा हक्कदार बनतो. म्हणजेच जर कर्मचाऱ्याने त्याच्या पीएफ खात्यात 10 वर्षे योगदान दिले असेल तर तो पेन्शन मिळण्यास पात्र आहे. त्यानंतर त्याने नोकरी सोडली किंवा नोकरी बदलली तरीही. पेन्शनचा दावा करण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक असते.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षे पीएफ खात्यात योगदान दिले आणि नंतर नोकरी सोडली तर पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याला त्याचा ईपीएस फंड सक्रिय ठेवावा लागेल. जर कर्मचाऱ्याने आवश्यकतेनुसार त्याच्या पीएफ खात्यातील संपूर्ण पैसे काढले पण त्याचा ईपीएस फंड तसाच राहिला, तर त्याला पेन्शन मिळेल.
परंतु जरी त्याने त्याच्या ईपीएस फंडाची संपूर्ण रक्कम काढली तरी त्याला पेन्शन मिळणार नाही. जर तुम्हाला पेन्शनचा लाभ हवा असेल तर तुम्ही ईपीएस फंड काढू नये.
ईपीएफओने ठरवून दिलेल्या नियमांनुसार, पीएफ खात्यात 10 वर्षे सतत योगदान देणारा कर्मचारी वयाच्या 50 वर्षांनंतर पेन्शनचा दावा करू शकतो. परंतु त्याने त्याचा EPS निधी काढलेला नसावा.