हा अभिनेता वेब सिरीज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. यामधूनच तो मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. त्याच्या लग्नाला 20 वर्षे होऊन देखील त्याच्या आईने सुनेला घरात घेतलं नाहीये. काय आहे कारण?
आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो बराच काळ बॉलिवूडमध्ये होता. मात्र, या अभिनेत्याच्या वेब सिरीजमधील अभिनयाचे लोक कौतुक करत आहेत.
या अभिनेत्याचे नाव पंकज त्रिपाठी आहे. पंकज त्रिपाठी आणि मृदुला त्रिपाठी यांचा विवाह 2004 मध्ये झाला होता. दोघांच्या लग्नाला आता 20 वर्षे झाली आहे.
मात्र, 20 वर्षानंतर देखील अभिनेत्याची आई अजूनही तिच्या सुनेवर रागावलेली आहे. तिला कुटुंबाचा भाग मानत नाही.
मृदुलाने अतुल युट्यूब चॅनलशी संवाद साधला होता. ती म्हणाली की, लग्नाला इतकी वर्षे होऊन देखील सासूने तिला सूनेचा दर्जा दिला नाही. जातीमुळे लग्नाला त्याच्या कुटुंबाचा विरोध होता.
पंकज त्रिपाठीच्या आई-वडिल म्हणाले की, मोठ्या कुळातून लहान कुळात मुलगी कशी येऊ शकते. त्यामुळेच मी तिला आजपर्यंत सून म्हणून स्विकारले नाही.
पंकज त्रिपाठी आणि मृदुला यांची पहिली भेट ही त्यांच्या बहिणीच्या लग्नात झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये आकर्षण होते. त्यावेळी पंकज 11 वीमध्ये होता तर मृदुला 9 वीमध्ये होती.
त्यानंतर मृदुलाच्या आईला पंकज आणि तिच्यावर संशय आला. मी वडिलांना सांगितले. त्यानंतर घरात मोठा गोंधळ झाला. लग्नाला दोन्ही कुटुंबानी हजेरी लावली पण सासू अजूनही नाराज आहे.