Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
वयानं मोठ्या असणाऱ्या अमृता सिंग हिच्यासोबत सैफ अली खानचं नातं त्याच्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर बदललं. 13 वर्षांनी या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला सूत्रांच्या माहितीनुसार घटस्फोटानंतर सैफनं अमृताला 5 कोटी रुपये इतकी पोटगी दिली होती.
पहिली पत्नी, ऋचा दत्तच्या निधनानंतर संजयनं रिया पिल्लई हिच्याशी दुसरं लग्न केलं. पण, ते फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर संजुबाबानं रियाला मुंबईत 8 कोटी रुपयांचा बंगला दिला होता.
अभिनेत्री करिष्मा कपूरनं व्यावसायिक संजय कपूर याच्याशी धुमधडाक्यात लग्न केलं. पण, 13 वर्षांतच या नात्याला कलाटणी मिळाली. दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. संजयनं करिष्माला घटस्फोटानंतर मुंबईतील आपलं घर आणि 14 कोटी रुपयांची पोटगी दिली.
मलायका अरोरा (Malaika arora) आणि अरबाज खान यांच्या नात्यात दुरावा येणं अनेकांनाच अनपेक्षित होतं. पण, शेवटी नियतीला हेच मान्य होतं. या घटस्फोटानंतर म्हणे अरबाजनं मलायकाला 10 ते 15 कोटी रुपयांची पोटगी दिली. तिनं मात्र हे वृत्त फेटाळलं.
(Hrithik Roshan Birthday) हृतिक आणि त्याची Ex Wife सुझॅन यांनी 14 वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. परस्पर सामंजस्यानं त्या दोघांनीही नात्याला पूर्णविराम दिला. मुख्य म्हणजे या घटस्फोटानंतर हृतिकनं सुझॅनला 380 कोटी रुपये इतकी पोटगी दिली होती.