PHOTOS

जन्नत आणि फैसलचे ब्रेकअप? इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, फोटो शेअर करत म्हणाली...

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपे जन्नत जुबैर आणि फैसल शेख यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. 

Advertisement
1/7

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या जन्नत जुबैर आणि फैसल शेख. 

2/7

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दोघांबद्दल अनेक बातम्या समोर येत आहेत. लवकरच हे जोडपे लग्न करणार असल्याची बातमी आली होती. 

3/7

दरम्यान, आता जन्नत आणि फैसल यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जन्नतने फैसलला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. 

4/7

यावरून समजते की दोघांमध्ये असे काय घडले की त्यांना हे पाऊल उचलावे लागले. मात्र, या जोडप्याने अद्याप त्यांच्या ब्रेकअपबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. 

5/7

जन्नतची एक गूढ पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने काही फोटो शेअर करताना जन्नतने लिहिले की, जे आहे ते स्वीकारा, जे होते ते सोडून द्या. जे होईल त्यावर विश्वास ठेवा. 

6/7

दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र फिरताना दिसले. अनेकदा त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. दोघेही खतरों के खिलाडी 12 मध्ये दिसले होते. 

7/7

येथूनच त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. वर्षानुवर्षे मैत्रीने सुरुवात झालेले हे नाते हळूहळू प्रेमात बदलले होते. सोशल मीडियावर दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे. 





Read More