PHOTOS

नवऱ्याला 'तसले' सीन्स दिल्याने अभिनेत्री एकता कपूरबरोबर कचाकचा भांडली; म्हणाली, 'तुझ्या नवऱ्याने आधी...'

Intimate Scenes Fight With Ekta Kapoor: खरं तर ही अभिनेत्री आणि एकता कपूर बेस्ट फ्रेण्ड आहेत. मात्र या दोघांमध्ये वादाचा खडा पडला तो या अभिनेत्रीच्या पतीला एकताने दिलेल्या काही इंटिमेट सिन्समुळे. नेमकं घडलं काय याबद्दल या अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे. ती काय म्हणाली आहे पाहूयात...

Advertisement
1/13

एकताबरोबर टोकाचा वाद झाल्याचा दावा या अभिनेत्रीनं एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलं आहे. थेट एकताचं नाव घेत तिने काय म्हटलं आहे जाणून घेऊयात...

2/13
3/13

पतीला इंटीमेट सीन करायला लावल्यामुळे आपलं निर्माती असलेल्या एकता कपूरबरोबर मोठा वाद झाला होता असा खुलासा या अभिनेत्रीनं केला आहे. आपण अनेक महिने एकता कपूरबरोबर बोलत नव्हतो असंही ही अभिनेत्री म्हणाली आहे.

 

4/13

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे निलम कोठारी! निलमने पती समीर सोनीला एकताने तिच्या मालिकेमध्ये इंटीमेट सीन शूट कराला लावल्यावरुन वाद घातल्याची कबुली दिली आहे. 

 

5/13

समीरला इंटीमेट सीन करायला लावल्याने माझा एकताबरोबर मोठा वाद झाला होता. या वादानंतर मी एकता बरोबर 3 ते 4 महिने बोलत नव्हते, असंही निलमने 'फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' या शोमध्ये गौप्यस्फोट करताना सांगितलं.

 

6/13

सध्या दाखवल्या जाणाऱ्या इंटिमेट सीनसंदर्भात निलमला तिचं मत विचारण्यात आलं. त्यावर निलमने आता आपल्याला या असल्या सीनसंदर्भात फारचं काही वाटत नाही किंवा त्यावर आपण आक्षेप घेत नाही असं स्पष्ट केलं. 

 

7/13

'झूम'बरोबर बोलताना निलमने, "मी माझ्या नवऱ्याबद्दल फार पझेसिव्ह आहे. मला कळलं की त्याचे काही इंटिमेट सीन आहेत. त्याबद्दल मला काही हरकत नव्हती. मात्र ते सीन किती इंटीमेट आहेत याची मला कल्पना नव्हती," असं सांगितलं.

 

8/13

नवऱ्याला ज्या शोमध्ये इंटिमेट सीन करायला सांगितले त्या शोची निर्माती एकता कपूर होती असंही निलमने सांगितलं. "या इंटिमेट सीनवरुन माझा आणि एकताचा जोरदार वाद झाल्यानंतर मी तिच्याशी 3-4 महिने अजिताब बोलत नव्हते," असा खुलासा निलमने केला.

 

9/13

"तू माझ्या नवऱ्याला हे असं करायला कसं सांगितलं? असा जाब मी एकताला विचारला. त्यावर तिने, तुझ्या नवऱ्याने आधी स्क्रीप्ट वाचली नव्हती का? असा सवाल विचारलाहोता. त्यानंतर आमचा वाद वाढत गेला," असं या वादाबद्दल बोलताना निलमने 'फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' या शोमध्ये सांगितलं.

10/13

आता आपला एकताबरोबर कोणताही वाद नसल्याचा खुलासा निलमने सध्याची परिस्थिती सांगताना म्हटलं. मला या वादामधून मोठा धडा मिळाल्याचा खुलासा निलमने केला.

 

11/13

"आता वाद मिटला आहे. मला यातून धडा मिळाला आहे. की हे प्रोफेशन असून इथे असं होणारच. काही सीन अभिनेत्याला करावेच लागतात. त्यामुळे आता मला काहीच हरकत नाही. माझ्या चांगल्या मैत्रिणीबरोबर आणि पतीबरोबर तसल्या सीनवरुन वाद घातल्यानंतर मी काय तो धडा शिकले आहे," असं निलम म्हणाली. 

12/13

यापूर्वी समीरने स्वत: 'जीप्लस'शी बोलताना निलमने आपल्या इंटिमेट सीनवर आक्षेप घेतल्याचं सांगितलं होतं. मी आधीपासूनच निलमला इंटिमेट सीनबद्दल सांगून ठेवायचो. मी प्रोजेक्ट घेण्याआधी तिची परवानगी घ्यायचो असं समीर म्हणाला.

 

13/13

"एकदा तिच्या एका मैत्रिणीने माझे तसले सीन पाहिले आणि तिला ती म्हणाली होती की तू तुझ्या पतीला हे असं काही कसं करु देतेस? असा सवाल विचारला होता. त्यानंतर मी तिला स्क्रीप्ट दाखवली होती," असं समीर म्हणालेला.

 





Read More