Extra Marital Affair: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहीत असताना देखील विवाहबाह्य संबंध ठेवले
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे घटस्फोट होण्याचे कारण अर्जुन कपूर आहे असं सांगण्यात येत आहे. मलायका लग्नबंधंनात असतानाही अर्जुन कपूरसोबत जवळीक ही त्यांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण होते. सध्या मलायका आणि अर्जुन एकमेकांसोबत क्वावीटी टाईम (Quality Time) घालवत आहे तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
या यादित टिव्ही वरील सुप्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीचा ही समावेश आहे. काम्या पंजाबी लग्नबंधंनात असताना ही विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा आरोप हा तिच्या माजी पती बंटी नेगीने केला होता. काम्या पंजाबीचं अफेअर बॉलिवूड स्टार संजय दत्तचा भाऊ निमाई बालीसोबत असल्याचा आरोप त्यांनी केला.
टिव्ही वरील चर्चेत असणार जोडपं अभिनेता आमिर अली आणि अभिनेत्री संजीदा शेख. आलेल्या माहितीनुसार संजीदा शेख यांच्यावरही विवाहबाह्य संबंधांचा आरोप आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण अभिनेता हर्षवर्धन राणे याला मानले जाते.
या वर्षी टिव्ही वरील या जोडप्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करुन मीडियाला मसाला दिला होता. हे जोडपं अजून कोणी नसून निशा रावल आणि करण मेहरा आहे. अभिनेता करणने निशावर आरोप केला की, त्याच्या पत्नीचे अफेअर तिचा भाऊ रितेशसोबत होते.
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर ही नेहमीच सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे लग्न आणि घटस्फोट हे चर्चेचा विषय होता. आलेल्या माहितीनुसार विवाहित असतानाच दीपिकानं शोएब इब्राहिमसोबत प्रेमसंबंध ठेवले होते. दीपिकाचा माजी पती रौनकपासून घटस्फोट झाल्यानंतर शोएबसोबत विवाह केला. आता ते दोघं एकमेकांसोबत खूप आनंदी राहत आहेत.