Famous Indian Actress To Marry: तुम्ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीला पाहिलं असेल. ती आता तिच्या प्रियकराबरोबर लग्न करणार असून हे लग्न गोव्यात होणार आहे. जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल...
मागील 15 वर्षांपासून हे दोघे रिलेशनमध्ये आहेत हे विशेष. आता या दोघांच्या घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली आहे. जाणून घ्या त्यांची अनोखी लव्हस्टोरी...
राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेली एक दाक्षिणात्य अभिनेत्री लवकरच अभिनेता वरुण धवनबरोबरच्या 'बेबी जॉन' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
मात्र हीच अभिनेत्री आता तिच्या बॉयफ्रेण्डबरोबर विवाहबंधनात अडकण्याच्याही तयारीत आहे. विशेष म्हणजे तिचा बॉयफ्रेण्ड हा दुबईमधील प्रसिद्ध उद्योजक आहे.
मागील 15 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेली ही अभिनेत्री आपल्या प्रियकराबरोबर पुढील महिन्यामध्ये गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात विवाहबंधनात अडकणार आहे.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे, किर्ती सुरेश! तर तिच्या बॉयफ्रेण्डचं नाव आहे अँथनी थातील.
'डेक्कन क्रॉनिकल'ने दिलेल्या वृत्तानुसार, किर्ती आणि अँथनी हे दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. दोघेही मागील 15 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत.
किर्तीच्या निकटवर्तीयांनी लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दोघांच्या कुटुंबियांचाही लग्नाला होकार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार किर्तीचं लग्न 11 आणि 12 डिसेंबर रोजी होणार आहे.
किर्ती आणि अँथनीने या दोघांनीही लग्नासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच ते घोषणा करतील असं सांगितलं जात आहे.
अँथनी हा मूळचा केरळमधील कोच्चीचा रहिवासी आहे.
केरळमधील एका नामांकित रेस्तराँचा अँथनी मालक असून अनेक ठिकाणी त्याचे रेस्तराँ आहेत.
किर्तीचे वडील निर्माते आणि अभिनेते सुरेश आणि आई अभिनेत्री मेनका यांनी लग्नाला होकार दिला असून अँथनीचे आई वडीलांनीही या दोघांच लग्न होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
आधी किर्ती ही 'जवान' चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंद्रबरोबर विवाह करणार असल्याच्या अफवाल समोर आल्या होत्या. या बातम्या खोट्या असल्याचं किर्तीनेच जाहीर केलं होतं.
'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये किर्तीने, "अनिरुद्धबरोबर लग्न होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. तो माझा चांगला मित्र आहे. माझं लग्न लवकरच होईल," असं काही काळापूर्वी म्हटलं होतं.