PHOTOS

3 हजारांचा वार्षिक FASTag पास दोन वाहनांसाठी लागू होतो का? नियम वाचाच!

...
Advertisement
1/8
3 हजारांचा वार्षिक FASTag पास दोन वाहनांसाठी लागू होतो का? नियम वाचाच!
3 हजारांचा वार्षिक FASTag पास दोन वाहनांसाठी लागू होतो का? नियम वाचाच!

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वार्षिक फास्टॅगची घोषणा केली आहे. बिगर व्यावसायिक वाहनांसाठी ही योजना आहे. वाहनधारकांना या योजनेअंतर्गंत 3 हजार रुपयांचा वार्षिक पास देण्यात येणार आहे. या पासमुळं तुम्ही वर्षभरात 200 वेळा महामार्गावरुन प्रवास करू शकणार आहेत. पण हा पास कसा काढायचा आणि दोन वाहनांसाठी एकच फास्टॅग वार्षिक पास चालतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

2/8

फास्टॅगचा वार्षिक पास हा राष्ट्रीय मार्गासाठीच वैध आहे. राज्यमहामार्गावर तुम्हाला या पासने प्रवास करता येणार नाही. 15 ऑगस्टपासून हा पास सुरू होणार असून याची मुदत 1 वर्ष किंवा 200 खेपा अशी असणार आहे. 

3/8

 फास्टॅगच्या या वार्षिक पासमुळं वाहनधारकांचे किमान 7 हजार रुपये वाचणार आहेत. तसंच, राष्ट्रीय महामार्गावर केवळ 15 रुपये एवढाच टोलखर्च सामान्यांना येईल. पण हा पास कसा काढायचा हे जाणून घेऊयात. 

4/8

वाहनाची पात्रता आणि त्याद्वारे घेण्यात आलेल्या फास्टॅगची पडताळणी केल्यानंतरच वार्षिक पास मंजूर करण्यात येईल. पास मंजूर झाल्यानंतर वाहनधारकांना राजमार्ग यात्रा मोबाइल अॅप आणि एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही हा पास खरेदी करू शकणार आहात.

5/8

3 हजारांचे शुल्क भरल्यानंतर नोंदणीकृत फास्टॅगवर वार्षिक पास अॅक्टिव्हेट केला जाईल. पास सक्रिय करताना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस येईल. वर्ष संपण्याआधी २०० टोल झाल्यानंतर पुन्हा 200 टोलसाठी किंवा वर्षभरासाठी पास खरेदी करू शकता.

6/8

पासची रक्कम ही दरवर्षी बदलता येऊ शकते. हे बदल दरवर्षी 1 एप्रिलपासून लागू होऊ शकते.

7/8

 फास्टॅग योजनेचा लाभ फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी गैर-व्यावसायिक वाहनांना मिळणार आहे. 

8/8

फास्टॅगचा वार्षिक पास हा नोंदणीकृत असलेल्या विशिष्ट वाहनांशी जोडलेला असणार आहे त्यामुळं तो दुसऱ्या वाहनांसाठी लागू होऊ शकत नाही.





Read More