PHOTOS

लेकीला पाहिल्यांदा मासिक पाळी आल्याचं जंगी सेलिब्रेशन! सजावट, केक अन्...; पाहा Photos

Father Celebrates Daughter First Period: मासिक पाळीसंदर्भात भारतीय सामाजामध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. अनेक ठिकाणी मासिक पाळी सुरु असलेल्या माहिलांना धार्मिक स्थळावर प्रवेश दिला जात नाही. मासिक पाळी सुरु झाल्यानंतर बऱ्याचदा मुली घाबरतात आणि नेमकं काय करावं कळत नाही. आपल्याकडे मासिक पाळीबद्दल मुक्तपणे संवाद साधला जात नाही. मात्र असं असतानाच उत्तराखंडमधील एका जोडप्याने आपल्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर नातेवाईकांबरोबर एकत्र येऊन चक्क सेलिब्रेशन केलं असून या सेलिब्रेशनचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

Advertisement
1/11

भारतीय समाजामध्ये आजही मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज कायम आहेत. मासिक पाळीकडे आजही वेगवगेळ्या समुदायांमध्ये आणि गटामध्ये फार चुकीच्या अर्थाने पाहिलं जातं. असं असतानाच उत्तराखडंमध्ये मासिक पाळीसंदर्भात एक जंगी सेलिब्रेशन झाल्याची माहिती समोर आली आहे.

2/11

येथील जिंतेद्र भट्ट यांनी मासिक पाळीसंदर्भातील चुकीचे समज दूर करण्यासंदर्भातील एक आदर्शन निर्माण केला आहे. मुलीची मासिक पाळी सुरु झाल्यानंतर जितेंद्र यांनी केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्यावर या कृतीसाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

3/11

मासिक पाळीसंदर्भात सामान्यपणे भारतीय समजामध्ये मोकळेपणे बोललं जात नाही. मासिक पाळी ही इतकी अपवित्र मानली जाते की अनेक धार्मिक स्थळांवर मासिक पाळीच्या वेळी महिलांना प्रवेश नाकारला जातो. मात्र जितेंद्र आणि त्यांच्या पत्नीने कन्येला पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर चक्क सेलिब्रेशन केलं आहे.

4/11

जितेंद्र हे काशीपूरमध्ये पत्नी आणि मुलीबरोबर राहतात. नुकतीच त्यांच्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली. यानंतर त्यांनी या विषयासंदर्भात बोलणं टाळण्याऐवजी सर्वांना एकत्र करुन ही गोष्ट साजरी केली.

5/11

जितेंद्र आणि त्यांच्या पत्नीने मुलीबरोबर बसून मासिक पाळी या विषयावर चर्चा केली. तिला मासिक पाळी म्हणजे काय, तिचं महत्त्व काय, अशा वेळी काय करावं याबाबतीत माहिती दिली. नंतर सर्व नातेवाईकांबरोबर मुलीला मासिक पाळी आल्याचं सेलिब्रेशनही केलं.

6/11

मासिक पाळी ही कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यामध्ये चुकीचं किंवा गैर असं काहीच नसतं असं जितेंद्र यांनी आपल्या मुलीला पटवून दिलं.

7/11

आपल्या मुलीने शरीरामध्ये झालेले हे बदल स्वीकारावेत, ती स्पेशल असल्याची जाणीव तिला करुन द्यावी या हेतूने जितेंद्र यांनी वाढदिवसाप्रमाणे एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन यानिमित्ताने केलं होतं. 

8/11

जितेंद्र यांनीच सोशल मीडियावरुन "मुलगी मोठी झाली. रागिनीची मासिक पाळी सुरु झाल्याचा आनंद आम्ही एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला," अशी कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत. 

9/11

जितेंद्र आणि त्यांच्या पत्नीने या सेलिब्रेशनसाठी जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलेले. यावेळेस रागिनीने केकही कापला. आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याने तिने केक कापला. 

10/11

रागिनीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. केक खाऊ घातला. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये घराचीही छान सजावट करण्यात आल्याचं दिसत आहे.

11/11

अनेकांनी जितेंद्र आणि त्यांच्या पत्नीने पुढाकार घेऊन मुलीला विश्वासात घेत केलेलं हे सेलिब्रेशन खरोखरच खास असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला यासंदर्भात उघडपणे सांगावं, तिला विश्वासात घ्यावं असं जितेंद्र सांगतात. 





Read More